मतदारयादीसाठी छायाचित्र नसणाऱ्यांनी त्वरित जमा करावीत : राजेंद्र पोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:49+5:302021-06-16T04:50:49+5:30
कुडाळ : ‘जावळी तालुक्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतंर्गत छायाचित्र बाकी ...

मतदारयादीसाठी छायाचित्र नसणाऱ्यांनी त्वरित जमा करावीत : राजेंद्र पोळ
कुडाळ : ‘जावळी तालुक्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतंर्गत छायाचित्र बाकी असणाऱ्या मतदारांनी पुढील तीन दिवसांत छायाचित्र जमा करावीत,’ असे आवाहन जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार जावळी तालुक्यात छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतंर्गत छायाचित्र बाकी असणाऱ्या १७४३ पैकी २४५ मतदारांनी आपले छायाचित्र जमा केले आहे. उर्वरित १४९८ मतदारांचे छायाचित्र येणे बाकी आहे. याबाबत तलाठी, ग्रामसेवक, मतदान केंद्रावरील केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नावे वगळण्यासाठी मतदार स्थलांतरित असल्याबाबत पंचनामा केला आहे. तरीही ज्या मतदारांची छायाचित्र जमा करता येत असतील त्यांनी आपले रंगीत छायाचित्र संबंधित मतदारयादी भागातील केंद्रस्तर मतदान अधिकारी किंवा निवडणूक शाखा तहसील कार्यालय मेढा येथे तीन दिवसांत जमा करावीत, अन्यथा मतदार स्थलांतरित, दुबार अथवा मयत असल्याचे ग्राह्य धरून यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.