शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाबरोबरच धरणसाठाही रुसला; साताऱ्यात पाणीप्रश्न पेटला

By नितीन काळेल | Updated: November 21, 2023 19:18 IST

सातारा : मान्सून संपला, परतीचा पाऊस गेला. पण, यंदा पावसाबरोबरच धरणातील पाणीसाठाही रुसला आहे. कारण, प्रमुख सहा प्रकल्पात ११७ ...

सातारा : मान्सून संपला, परतीचा पाऊस गेला. पण, यंदा पावसाबरोबरच धरणातील पाणीसाठाही रुसला आहे. कारण, प्रमुख सहा प्रकल्पात ११७ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्केही भरलेली नाहीत. त्यातच जिल्ह्यातील धरणातील पाणी सोडण्यावरुन संघर्ष पेटू लागल्यामुळे दुष्काळी स्थितीची दाहकता समजून येत आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, मान्सूनच्या पावसाने साफ निराशा केलेली आहे. पूर्व भागात तर दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. पाझर तलाव कोरडे पडले असून ओढ्यात ठणठणाट आहे. यामुळे रब्बी हंगाम घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणातून पिण्यासाठी आणि सिंचनासाठीही पाण्याची तरतूद केलेली आहे. या सर्व प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७६ टीएमसी इतकी आहे.पण, यंदा मान्सूनचा पावसाने सरासरीही गाठली नसल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, एकाही धरणात १०० टक्के पाणीसाठा झालेला नव्हता. आतातर आणखी परिस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. परिणामी आहे त्या साठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

उरमोडीत अवघा ५७ टक्क्यांवर साठा..सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात उरमोडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता ९.९६ टीएमसी इतकी आहे. पण, या धरणक्षेत्रात कमी पाऊस झाला. परिणामी धरण भरलेच नाही. सध्या तर ५.७१ टीएमसीच साठा शिल्लक आहे. म्हणजे धरणात ५७ टक्क्यांवर पाणी आहे. त्यातच या धरणातील पाण्यावर सातारा तालुक्याबरोबरच माण आणि खटाव तालुक्यातील पिण्याचे पाणी आणि शेती पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. धरण भरले नसल्याने आवर्तनावर परिणाम होणार आहे.

येरळवाडीत शुन्य टक्के साठाखटाव तालुक्यात येरळवाडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १.१५ टीमएसी आहे. पावसाअभावी धरणसाठा झालाच नाही. सध्या या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. त्यातच या धरणावर खटावमधील अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून असतात. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या उग्र स्वरुप धारण करणार आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे  -गतवर्षी  - यावर्षी - यंदाची टक्केवारी - एकूण क्षमताधोम   - १३.०३ -  ११.१४ -  ८२.५३  -  १३.५०कण्हेर -  ९.५४  -  ७.१८  - ७१.७०  - १०.१०कोयना - ९९.९३ -  ८५.६० -  ८१.३३  -  १०५.२५बलकवडी - ४.०५ -  २.६७   - ६४.४३  - ४.०८उरमोडी - ९.९४ - ५.७१ - ५७.३१  - ९.९६तारळी - ५.४९ -  ५.२३  -  ८९.३८  -  ५.८५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळWaterपाणी