जखिणवाडी ग्रामपंचायतीस तेरावा पुरस्कार

By Admin | Updated: January 5, 2015 00:45 IST2015-01-04T21:30:17+5:302015-01-05T00:45:34+5:30

शिरपेचात नवा तुरा : यशवंत पंचायत राजमध्ये पुणे विभागात पाचवा क्रमांक

Thirvaa Award for Gram Panchayat Gram Panchayats | जखिणवाडी ग्रामपंचायतीस तेरावा पुरस्कार

जखिणवाडी ग्रामपंचायतीस तेरावा पुरस्कार

मलकापूर : यशवत पंचायतराज अभियानांतर्गत विविध कसोट्या पार करत जखिणवाडी ग्रामपंचायतीने पुणे विभागात पाचवा क्रमांक पटकावला़ पुणे विभागाच्या उपायुक्तांनी हा पुरस्कार जाहीर करून जखिणवाडी ग्रामस्थांना नववर्षाची भेटच दिली़ गावाने आजपर्यंत हा तेरावा पुरस्कार प्राप्त केल्यामुळे ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला़
यशवंत पंचायतराज हे अभियान केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येते़ या योजनेत प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय व्यवस्थापन, विकास कार्यातील उत्कृष्ठ काम, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, भौतिक व आर्थिक उद्दिष्ट्य, वेळोवेळी केलेले अचूक लेखापरीक्षण, यासह गावाची विविध पातळीवर तपासणी करण्यात येते़
त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या पथकाने जखिणवाडी गावाची तपासणी करून पुणे विभागाकडे अहवाल सादर केला होता़ सर्व कसोट्या पार करत जखिणवाडी गावाने पुणे विभागात पाचवा क्रमांक पटकावला आहे़ पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला़ ग्रामस्थांनी सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच महेश गुरव, ग्रामसेवक सदाशिव खांडके व सदस्यांचे अभिनंदन केले़ जखिणवाडी गावाने चार वर्षांत विविध पातळीवर सातत्य राखत शासनाचे १२ पुरस्कार मिळवले होते़ हा तेरावा पुरस्कार प्राप्त करून गावाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे़ (वार्ताहर)


नवीन वर्षाची सुरूवातच पुरस्काराने झाली आहे़ पुरस्कार मिळवण्यासाठी गावातील रामदादा पाटील, पी़ जी़ पाटील, पंचायती समिती सदस्या पुष्पावती पाटील, रामराव नांगरे-पाटील, संपत पाटील, तानाजी कणसे या ज्येष्ठांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे़ त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले़ भविष्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता व यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट आहे़
- नरेंद्र नांगरे-पाटील, सरपंच

Web Title: Thirvaa Award for Gram Panchayat Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.