शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

Satara: शिरवळ येथील चोरीतील आंतरजिल्हा टोळी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 13:00 IST

मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील औदयोगिक क्षेञातील एका कंपनीतील चोरी प्रकरणी शिरवळ पोलिसांनी धडक कारवाई करत सराईत ...

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील औदयोगिक क्षेञातील एका कंपनीतील चोरी प्रकरणी शिरवळ पोलिसांनी धडक कारवाई करत सराईत आंतरजिल्हा टोळीच्या अवघ्या दोन दिवसांमध्ये मुसक्या आवळल्या.  याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील पंढरपूर फाट्याजवळील नायगाव रोडला ट्रान्सफार्मर तयार करणारी कंपनी असून मध्यराञी शनिवारी (दि. 12) कंपनी आवारामध्ये चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करीत स्टोअर रुम, शाँप फ्लोअरमधून सुमारे 10 लाख 58 हजार 400 रुपयांचा 1512 किलो वजनाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. सदरील घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांना तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित चोरटे हे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी अविनाश दिपक मछले उर्फ अविनाश कोकाटे (वय 24), स्वप्निल महेश गारुंगे (23 दोघे रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी पिकअप (क्रं.एमएच-09-एफवाय-2599) चालक शिवाजी प्रभु तोरे (वय 42, रा. कोल्हापूर मूळ रा. जिवळी जि.उस्मानाबाद) व चोरीचे साहित्य घेणारा विनायक बाळासो गोसावी (42, रा. गुटकेश्वर काँलनी, शिंगणापूर, कोल्हापूर) यांना जेरबंद केले. संशयित आरोपींना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नवनाथ मदने हे करीत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी