शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: लक्ष्मीपूजनासाठी घरी आणलेले ११० तोळ्यांचे दागिने चोरीस, दीड लाखाची रोकडही लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 16:02 IST

कऱ्हाड : लक्ष्मीपूजनासाठी घरात आणलेले ११० तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ओगलेवाडी, ता.कऱ्हाड ...

कऱ्हाड : लक्ष्मीपूजनासाठी घरात आणलेले ११० तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ओगलेवाडी, ता.कऱ्हाड येथील उद्योजकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी केलेली ही सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी-करवडी फाटा येथील खरेदी-विक्री संघाच्या पाठीमागे ओढ्यालगत उद्योजक दिवंगत वसंत खाडे यांचा ‘साई व्हिला’ बंगला आहे. याच ठिकाणी त्यांचे वर्कशॉप व गारमेंट आहे. वसंत खाडे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले असून, त्यांची पत्नी, मुलगा प्रतीक व सून असे ‘साई व्हिला’ बंगल्यात वास्तव्यास आहेत. दिवाळीचा सण असल्याने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान वर्कशॉप व गारमेंटमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. केवळ रात्र व दिवसपाळीसाठी तीन सुरक्षारक्षक शिफ्टनुसार कामावर हजर होते.२ नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रतीक व त्यांच्या पत्नी दोघे जण सांगली येथे पत्नीच्या माहेरी गेले, तर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची आई हजारमाची येथील त्यांच्या माहेरी गेल्या. जाताना त्यांनी बंगल्याला कुलूप लाऊन घराची चावी घरकामासाठी येणाऱ्या व त्यांच्याच बंगल्यासमोरील जुन्या घरात वास्तव्यास असलेल्या महिलेकडे दिली.दरम्यान, सोमवारी सकाळी सुरक्षारक्षक बंगल्याच्या परिसरातील लाइट बंद करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना वरच्या मजल्यावरील दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर खाडे कुटुंबीय घरी आले. त्यावेळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच, उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरविली. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले.

समोर सुरक्षारक्षक; चोरटे पाठीमागून घुसलेबंगल्याच्या समोर असलेल्या केबिनमध्ये रात्रपाळीचा सुरक्षारक्षक हजर होता, तर चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या खिडकी व बाल्कनीच्या रेलींगला दोऱ्या बांधून बंगल्यात प्रवेश केल्याचे पोलिसांच्या पाहणीतून समोर आले आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैदबंगला, वर्कशॉप व गारमेंट एकाच ठिकाणी असल्याने बंगल्याच्या संपूर्ण आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चोरी करण्यासाठी आलेले दोन इसमही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम घरात घुसल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस