रहदारी अजिबात नसताना... लॉकडाऊन असताना रस्त्यावर असा अपघात होऊ शकतो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:52 IST2020-04-17T13:43:04+5:302020-04-17T13:52:06+5:30
सातारा : येथील बसस्थानक पाठीमागील पारंगे चौकामध्ये पोलीस व्हॅनने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात ...

रहदारी अजिबात नसताना... लॉकडाऊन असताना रस्त्यावर असा अपघात होऊ शकतो...
सातारा : येथील बसस्थानक पाठीमागील पारंगे चौकामध्ये पोलीस व्हॅनने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला. अण्णा मोरे (रा. शाहूपुरी, सातारा) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पोलीस व्हॅन पोवई नाक्यावरून पोलीस परेड मैदानाकडे निघाली होती. यावेळी समोरून आलेले दुचाकीस्वार अण्णा मोरे यांना पोलीस व्हॅनची जोरदार धडक बसली. या धडकेत मोरे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी जखमी मोरे यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर रहदारी अजिबात नाही, असे असतानाही हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.