शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शकता आहे...विद्यार्थ्यांनी पाऊल पुढे टाकावेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 23:53 IST

राजेश चव्हाण : कोल्हापूर कृषी महाविद्यालय, राहुरी कृषी विद्यापीठानं घडवलं; एम.एस्सी. अ‍ॅग्रीनंतर तहसीलदारपदाला गवसणी

सागर गुजर -- सातारा --स्पर्धा परीक्षेसाठी जीव तोडून मेहनत घेणाऱ्यांना प्रशासनात हमखास संधी आहे. या परीक्षेत पारदर्शकताही तितकीच आहे. अभ्यासातील सातत्य आणि परिश्रमावरील विश्वास या दोन गोष्टी प्रशासनात येऊ पाहणाऱ्या जिगरबाज तरुणांना रोखू शकत नाहीत, असं अनुभवसिद्ध सूत्र साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सांगितलं.बारामती तालुक्यातील डोरलेवाडी हे मूळगाव असणाऱ्या राजेश चव्हाण यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व निरीक्षणाच्या जोरावर तहसीलदारपद मिळविले आहे. या यशामध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय आणि राहुरी कृषी विद्यापीठाचा मोठा वाटा असल्याचे ते अभिमानाने सांगत होते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्यांनाही बालपणी विटी-दांडू, गोट्या असे खेळ खेळण्याची आवड होती. विहिरी, कॅनॉलमध्ये पोहायचे, घरच्या शेतात गरज असेल तेव्हा राबायचे, असेच त्यांचे बालपण व शालेय जीवनातील प्रसंग होते. त्यांचे वडील मोतीराम चव्हाण हे डोरलेवाडीतील पहिलेच पदवीधर! वडील पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये माध्यमिक शिक्षक असल्याने राजेश चव्हाण यांचे शिक्षण पुणे, बारामती येथील विविध विद्यालयांमध्ये झाले. पहिली ते सहावीपर्यंत ते वाणेवाडी या गावात शिकले. सातवी ते आठवीपर्यंत इंदापूर तालुक्यातील कळस येथे त्यांचे शिक्षण झाले. वडील ज्या ठिकाणी बदलून जात, त्या गावातील शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागत होता. शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने वडिलांनी त्यांना वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात प्रवेश घ्यायला लावला. परिसरातील चांगल्या दर्जाची शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक होता. नववी व दहावी ही दोन वर्षे या शाळेतच काढली. दहावीला ८७ टक्के गुण मिळाले. बारावीची परीक्षा त्यांनी बारामतीमधील तुळजाराम चतूरचंद सायन्स कॉलेजमधून केली. यानंतर वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी असे दोनच पर्याय सायन्सची मुले निवडत असत; मात्र राजेश चव्हाण यांनी बी.एसस्सी. अ‍ॅग्री करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात मन लावून त्यांनी बी.एसस्सी. पूर्ण केली. एम.एसस्सी. अ‍ॅग्रीसाठी त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. राहुरी कृषी विद्यापीठात आल्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. आयुष्यातील ध्येय निश्चित झाली. मुलाखतीचे तंत्र, गु्रप डिस्कशन, प्रश्नपत्रिकांचा सराव असं रोजचं काम सुरू होतं. पहाटे पाच वाजता उठायचे. रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास करायचा, असा नित्यनेम सुरू झाला. २००० मध्ये ते एम.एसस्सी. अ‍ॅग्री झाले. दोन वर्षे त्यांनी मन लावून एमपीएससीचा अभ्यास केला. २००१ मध्ये त्यांनी नायब तहसीलदार पदाची परीक्षा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांक उत्तीर्ण केली. सांगली, वाई, वडगाव मावळ या ठिकाणी प्रशासकीय सेवा बजावल्यानंतर ते साताऱ्यात तहसीलदार म्हणून रुजू झाले. आपण स्वत: कृषी पदवीधर असल्याने शेती करणाऱ्यांविषयी आत्मीयता कायम राहिली आहे. राजस्व अभियानाच्या माध्यमातून काम करत असताना खूप आनंद होतो. पाणंद रस्ते, शेतामध्ये जोडणारे रस्ते तयार करत असताना रस्त्यांची किती गरज आहे, हे लक्षात आले. शेती संदर्भातील कामे करत असताना फार समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. कृषी पदवी घेतल्याचे सार्थक या निमित्तानं झालं आहे. पत्नी शीतल या दिव्या व मुग्धा या दोन मुलींची विशेष काळजी घेतात. प्रशासकीय कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडं त्याच लक्ष देतात. संयम ठेवा, यश तुमचेच!स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना संयम महत्त्वाचा असतो. जे ध्येय मनात बाळगले आहे, त्या ध्येयाच्या दिशेने जाताना आळस, थकवा, कौटुंबिक परिस्थिती, वाढते वय या बाबी त्रासदायक ठरतात; मात्र अभ्यासावर लक्ष ठेवून वाटचाल केल्यास शंभर टक्के यश मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांनी काही झाले तरी ध्येयाची दिशा बदलता कामा नये, असे राजेश चव्हाण सांगतात.ग्रुप डिस्कशनमुळे सर्व सोपेराहुरी येथील कृषी एकता मंचचे मुलांच्या एमपीएससी परीक्षेतील यशामध्ये मोठा वाटा आहे. या मंचने प्रशस्त हॉल उपलब्ध करून दिला आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच मुलाखतीसाठी लागणारे तंत्र आम्हाला शिकविले. मुलाखतीला सामोरे जाताना मनात थोडी चलबिचल राहणे साहजिक असले तरी गु्रप डिस्कशनच्या प्रभावी माध्यमामुळे आमचा आत्मविश्वास वाढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.