शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डही नाही... अन् धान्यही नाही!

By admin | Updated: November 9, 2015 23:28 IST

पाटण : जनता दरबारात तक्रारींचा डोंगर

पाटण : तालुक्यातील अनेक लोकांना अद्याप रेशनकार्ड मिळालेली नाहीत. तर गावागावांतील धान्य दुकानदार धान्य देत नाहीत. याबाबत पाटणला घेतलेल्या जनता दरबारात तक्रारींचा डोंगर आल्यानंतर आमदार शंभूराज देसार्इंनी याबाबतच्या तक्रारींची स्वत: तहसीलदारांनी पंधरा दिवसांत चौकशी करावी. लोकांना धान्य वेळेत मिळाले पाहिजे, अशा सूचना केल्या.पाटण तहसील कार्यालयात शनिवारी घेण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार देसाई बोलत होते. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी अरविंद पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे व सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.म्हावशी येथील संस्थेमार्फत वाटप करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाचा चालक ज्ञानदेव गावडे बिगर पावतीने धान्य वाटप करतात. कसलेही रेकॉर्ड ठेवत नाहीत. याला पुरवठा शाखेचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत, अशी तक्रार करण्यात आली. दारिद्र्यरेषेखाली समावेश करावी, अशी अनेक गरजू महिलांनी यावेळी मागणी केली. तर घरकूल मिळत नाही आणि रेशनकार्ड बोगस असल्याचे दुकानदार सांगत असून, धान्य देत नसल्याची तक्रार आमदार देसाई व तहसीलदारांसमोर करण्यात आली. मूळगाव येथील पाणलोट कामाची चौकशी करावी, अशी मागणी उत्तम मोळावडे यांनी केली. मरळी वीज कार्यालयातील कालेकर नावाचा अधिकारी लोकांना उर्मट बोलत असून, पापर्डे गावातील एका शेतकऱ्याची त्याने अडवणूक केल्यामुळे सहा महिने झाले तरी ट्रान्सफॉर्मर बसविला नाही. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही, पिके वाळली आहेत. ‘पाटण तालुका डोंगरी असून, या तालुक्यात तीन डॉक्टर द्या,’ अशी मागणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली असल्याचे आमदार म्हणाले. शांतीसागर पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्याचे पैसे मिळावे, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)आजीबार्इंकडे आमदारांचा मोबाईल नंबरघोट येथील सोनवले नावाच्या वृद्ध महिलेने जनता दरबारात ‘घरकूल द्या’ म्हणून पुन्हा मागणी केली. त्यावर आमदारांनी ‘आजीबाई तुमची दखल घेतली आहे. संबंधित अधिकारी तुमच्या घरी येतील नाही आले तर मला सांगा,’ त्यावेळी आजीबाई पटकन म्हणाल्या की, ‘तुमचा नंबर माझ्याकडे आहे.’ यावर उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त झाले.गवळीनगर रस्त्याचे काम अर्धवटमोरणा विभागातील गवळीनगर रस्त्याचे काम पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराने अर्धवट ठेवले असून, याबाबतची तक्रार गवळीनगर (कोकिसरे) येथील ग्रामस्थांनी यावेळी केली. तसेच मोरणा-गुरेघर प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यामुळे आंबेघर तर्फ मरळीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यांना मोबदला मिळावा, अशी तक्रार झाली