शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:15 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. याआधी विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाला मतदार याद्यांबाबत निवेदन दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच्या मतदारयाद्यांचे स्वरूप कसे असावे यासंबंधी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सूचना केल्या. मतदार यांच्यावरुन विरोधी पक्षांनी आयोगावर गंभीर आरोप केले. दरम्यान, आता मंत्री शंभूराज देसाई यांनी शिष्ठमंडळाच्या बैठकीवर टीका केली.

विरोध पक्ष पहिल्यापासूनच मतदार यादीत घोळ आणि व्हीव्हीपॅट मशीन बाबत मागणी करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या ठिकाणी निवडून येतात त्या ठिकाणी घोळ नसतो. त्यांचा पराभव झाला की, मशीन मध्ये घोळ असतो, असा टोला मंत्री देसाई यांनी लगावला. 

“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली

"बॅलेट पेपर असताना मशीन काँग्रेस सरकारच्या काळात आले आहे, त्यावेळी त्यांनी ते स्वीकारले आहे. ज्यावेळेस या तक्रारी झाल्या आहेत, ही न्यायालयीन बाब देखील झाली होती. महाविकास आघाडीने तक्रारी करण्याशिवाय काही कामे केलेली नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पराभव दिसू लागला आहे. याची कारण आधीच शोधायचे काम सुरू आहे, असा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. उद्या पराभव जरी झाला, तरी जनतेला कारण काय द्यायची यासाठी हा चालेला खटाटोप आहे. निवडणूक आयोगावर विश्वास नाही, तर मग आपण का गेलात भेटायला. संजय राऊत दोन तोंडाने बोलतात.राऊत यांना फक्त तुम्ही महत्व देता इथं कोणीही महत्त्व देत नाही, अशी टीका देसाई यांनी केली.

जयंत पाटलांचा गंभीर आरोप

"सकाळी सगळ्या वृत्तवाहिन्यांवर मतदार याद्यांची बातमी दाखवता. त्यावर पुरावे समोर येतात. दुपारी ती नावे निवडणूक आयोगाच्या वेसाईटवर असतात पण, सायंकाळी सहा वाजता ती नावे गायब होतात. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरं कोणतरी चालवतो', असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला. 

आज विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार याद्यांतील घोळाबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी केली. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केले. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईElectionनिवडणूक 2024Jayant Patilजयंत पाटीलRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे