शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
2
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
3
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
4
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
5
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
6
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
7
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
8
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
9
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
10
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
11
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
13
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
14
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
15
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
16
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
17
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
18
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
19
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
20
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: राष्ट्रीय महामार्गबाजुच्या थांब्यावर घोंगावतोय मृत्यू, प्रवासी थांबतात रस्त्यावरच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:50 IST

वडापवाले, प्रवाशांकडून महामार्ग हायजॅक; रात्रीच्या वेळी खासगी बसची खेटाखेटी

माणिक डोंगरेमलकापूर : महामार्गालगतच्या थांब्यांवर ट्रॅव्हल्स, वडाप, खासगी वाहने व महामार्गावरच उभा करून राजरोसपणे प्रवासी घेतात. प्रवासी निम्म्या रस्त्यावर बेजबाबदारपणे उभे राहतात. यामुळे अशा ठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे. या ठिकाणी दिवसातून किमान एक दोन लहान-मोठे अपघात घडतच असतात. आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे.कराड व मलकापूर शहराचे प्रवेशद्वारे म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी व किरकोळ अपघातांची नेहमी मालिकाच सुरू असते. कराडलगतचे झपाट्याने वाढणारे शहर म्हणून मलकापूरची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे कराडसह मलकापूरमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

वाचा : खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावटकोल्हापूर नाक्यासह शिवछावा चौक, कृष्णा रुग्णालय परिसर, मलकापूर फाटा, कोयना वसाहत, नांदलापूर अशा ब्लॅक स्पॉटवर वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी गर्दीतून मार्ग काढताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा लागतो. महामार्गावरून जाणारी वाहने भरधाव वेगात असतात. प्रवासी घेण्यासाठी वाहने महामार्गावरच उभा केलेली असतात. प्रवासीही वाहनांची वाट बघत निम्या महार्गावर उभे राहिलेले असतात. त्यामुळे वेगात असलेले वाहन उभ्या राहिलेल्या प्रवाशांच्या घोळक्यात घुसून अनेकवेळा अशा ठिकाणी लहानमोठे अपघात घडले आहेत. महामार्ग व्हीआयपी वडापने तर उपमार्ग स्थानिक वडापने हायजॅक केल्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरूनच यावे जावे लागते. महामार्गावरची सुसाट वाहने उभ्या प्रवाशांच्या घोळक्यात घुसून किंवा प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या वाहनावर आदळून अपघात झाले आहेत. 

पोलिसांसमोरच राजरोस वडापकोल्हापूर नाक्यावर विविध मार्गावर परमीट व बिगर परमीट वडाप करणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहेत. ती उपमार्गावर ठाण मांडतात. तर कराडहून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दररोज व्हीआयपी वडापची वाहने महामार्गावरच उभी असतात. दिवसभर याठिकाणी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसमोरच राजरोसपणे प्रवाशांची चढ-उतार सुरू असते.रात्रीच्या वेळी खासगी बसची खेटाखेटीकोल्हापूर नाक्यावर सायंकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत काही कामानिमित्त जायचे म्हटले की अंगावर काटाच उभा राहतो. रात्रीच्या वेळी शेकडो खासगी प्रवासी बस कोल्हापूर नाक्यावरून पुण्या-मुंबईकडे जातात. त्यातील बहुतांशी बस प्रवासी घेण्यासाठी या ठिकाणी थांबतात. यापैकी अनेक बसचालकांनी उपमार्गासह महामार्ग हायजॅक करून थैमान सुरू असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Highway stops a death trap; passengers wait on roads.

Web Summary : Satara's highway stops are perilous. Passengers waiting on roads face constant accident risks. Numerous injuries and fatalities have occurred due to vehicles stopping and passengers waiting on the highway, especially at Kolhapur Naka. VIP buses exacerbate the danger, with police seemingly ignoring the chaos.