शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

महसूलची कारवाई : माणगंगा नदीपात्रात वाळू चोरीचा धडाका सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 17:33 IST

Crimenews Satara : माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरीचा धडाका सुरुच आहे. मात्र तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांवर कारवायाचा बडगा उगारल्याने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. देवापूर येथील माणगंगा नदीपात्रातून वाळूची चोरी करणाऱ्या टेंपोवर महसूल विभागाने कारवाई करत वाळू भरलेला टेम्पो व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.

ठळक मुद्देमाणगंगा नदीपात्रात वाळू चोरीचा धडाका सुरुचवाळू वाहतूक करणारा टेम्पो महसूल विभागाने पकडला

म्हसवड : माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरीचा धडाका सुरुच आहे. मात्र तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांवर कारवायाचा बडगा उगारल्याने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. देवापूर येथील माणगंगा नदीपात्रातून वाळूची चोरी करणाऱ्या टेंपोवर महसूल विभागाने कारवाई करत वाळू भरलेला टेम्पो व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.याबाबत माहिती अशी की, हिंगणीचे कोतवालांना अवैध्य वाळू तस्करीची माहिती फोनवरून मिळताच पोलीस पाटील व कोतवाल यांनी हिंगणीकडे जाणाऱ्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन पळून जाण्याच्या इराद्याने देवापूरकडे निघाले. याची संपूर्ण माहिती माणच्या तहसीलदारांना देताच त्यांच्या आदेशानुसार सर्कल ऑफिसर उमरसिंह परदेशी व देवापूरचे तलाठी आनंदा सूर्यवंशी यांनी कालापट्टा देवापूर याठिकाणी जाऊन सदर वाहन ताब्यात घेतले.

ही कारवाई करत असताना नदी पलिकडे कोतवाल व पोलीस पाटील यांनी दोन दुचाकी नदी पलीकडे लावली होती. कारवाईनंतर परत जाताना त्यांना दोन्हीही गाडीची मोडतोड केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विशाल पोपट माने (रा. हिंगणी), दाजी शरद येडगे (दोघे रा. हिंगणी) व अनोळखी एका म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत.कारवाईत उमरसिंह परदेशी व देवापूरचे तलाठी आनंदा सूर्यवंशी, हिंगणीचे पोलीस पाटील व कोतवाल यांनी सहभाग घेतला.कोतवाल व पोलीस पाटलांच्या गाड्यांची मोडतोडटेम्पोवर कारवाई करून माघारी निघालेल्या कोतवाल व पोलीस पाटलांच्या दोन्ही मोटर सायकलचे अज्ञाताने नुकसान केले आहे. निर्ढावलेल्या वाळू तस्करांचा कायम स्वरुपी बंदोबस्त होण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जनतेतून होत आहे. माणमध्ये यापूर्वीही जिवे मारण्यापर्यंत हल्ले झाले आहेत.

कोरोनाशी सामना करावा लागत असताना तहसीलदार व त्यांच्या पथकाने अवैध्य तस्करीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. वाळू तस्करांनी महसूल मधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून म्हसवड शिरताव, देवापूर याठिकाणी नदीपात्र पोकरण्यास सुरूवात केली. 

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारीman-acमाणTahasildarतहसीलदारSatara areaसातारा परिसर