उंडाळे: तुळसण ता. कराड येथील निनाई देवी मंदिरात देवीच्या अंगावरील दागिन्यावर चोरट्याने डल्ला मारला. देवीच्या अंगावरील दोन मंगळसूत्रासह रोकड लंपास केली. याघटनेने परिसरात खळबळ उडाली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळसण येथील निनाई देवी मंदिरात चोरट्याने मंदिराच्या पूर्वेकडील असणाऱ्या दरवाजाचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील दोन मंगळसूत्र आणि दानपेटीत असणारी दोन हजार रुपयाची रोकड लंपास केली. सकाळी पुजारी विलास तुकाराम गुरव हे पूजा करण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. कराड तालुका पोलिस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पीएसआय एस .जी. जाधव करीत आहेत.
Satara: देवीच्या अंगावरील दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:33 IST