शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर झाली ओळख, ‘त्यानं’ अश्लील फोटो मागितले ‘तिने’ पाठविलेही; अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 13:37 IST

दोघांचं बिनसल्यानंतर त्यानं ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तिचे खासगी अश्लील फोटो मागितले. तिने भीतीपोटी ‘तसले’ फोटो त्याला पाठविलेही.

सातारा : एकमेकांची मैत्री झाल्यानंतर भान हरपून केलेले कृत्य अंगलट येते, तेव्हा डोळ्यासमोर काजवे चमकण्याऐवजी पोलीस दिसतात. असंच एका युवतीच्या बाबतीत घडलंय. सोशल मीडियावरून दोघांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीने हद्दच ओलांडली. त्यानं तिच्या खासगी अश्लील फोटोंची मागणी केली अन् तिने पाठविलेही. पण जेव्हा या दोघांचं बिनसलं, तेव्हा त्यांनं ‘तसले’ फोटो तिचा भाऊ, बहीण यांना पाठविले. यावरून संबंधित युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणी २४ वर्षांची असून, साताऱ्यातील एका शोरूममध्ये ती नोकरी करत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची आणि पंढरपुरातील एका तरुणाची सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्रीही झाली. भेटीदरम्यान दोघांनी एकत्र फोटोही काढले. मात्र, दोघांचं बिनसल्यानंतर त्यानं ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तिचे खासगी अश्लील फोटो मागितले. तिने भीतीपोटी ‘तसले’ फोटो त्याला पाठविलेही. पण एक चूक झाकण्यासाठी त्या तरुणीनं आपले खासगी फोटो पाठवून दुसरी चूक केली. पहिल्या धमकीवेळीच जर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असती, तर पुढचे बालंट टळले असते...तेव्हा तरुणीच्या पायाखालची वाळू सरकलीवाढता त्रास टाळण्यासाठी तिनं त्याचा नंबर आणि इन्स्टाग्राम अकौंट ब्लॉक केलं. त्यामुळे संतापलेल्या युवकानं तिचा चुलत भाऊ, बहीण यांच्या अकौंटवर ‘तसले’ फोटो पाठविले. तेव्हा त्या तरुणीच्या पायाखालची वाळू सरकली. तिने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या युवकाच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने त्या युवकाचा शोध घेतला. मात्र, तो पंढरपूरचा रहिवासी असल्यामुळे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडण्यासाठी सातारा पोलिसांचे एक पथक पंढरपूरला रवाना झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी