साताऱ्यातील करंजेत आढळला छत्रपती शहाजी राजे यांच्या कारकिर्दीतील दगडी शिलालेख, संग्रहालयात संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:55 IST2025-04-08T15:54:27+5:302025-04-08T15:55:45+5:30

सातारा : करंजे नाका येथील पुलावर आढळून आलेल्या दगडी शिलालेखाचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात संवर्धन केले जाणार आहे. हा ...

The stone inscription found on the bridge at Karanje Naka in Satara will be preserved in the Chhatrapati Shivaji Maharaj Museum | साताऱ्यातील करंजेत आढळला छत्रपती शहाजी राजे यांच्या कारकिर्दीतील दगडी शिलालेख, संग्रहालयात संवर्धन

साताऱ्यातील करंजेत आढळला छत्रपती शहाजी राजे यांच्या कारकिर्दीतील दगडी शिलालेख, संग्रहालयात संवर्धन

सातारा : करंजे नाका येथील पुलावर आढळून आलेल्या दगडी शिलालेखाचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात संवर्धन केले जाणार आहे. हा शिलालेख १८४९ सालचा व छत्रपती शहाजी राजे ऊर्फ आप्पासाहेब महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे, अशी माहिती संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

करंजे पुलावर एक दगडी शिलालेख असल्याची माहिती शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांनी दिली होती. त्यानुसार अभिरक्षक प्रवीण शिंदे व कर्मचाऱ्यांनी या शिलालेखाची पाहणी करून त्याचे संग्रहालयात संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. या शिलालेखाचे अनिल दुधाने यांनी वाचन केले.

शिलालेख १८४९ सालातील असून, छत्रपती शहाजी राजे ऊर्फ अप्पासाहेब महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे. संग्रहालयातील इतिहास गॅलरीत हा शिलालेख पाहण्याकरिता ठेवण्यात येणार असल्याचे अभिरक्षक शिंदे यांनी सांगितले.

शिलालेखावरील मजकूर असा..

हा पूल श्रीमंत शाहजी महाराज आप्पासाहेब छत्रपती सातारा येथील यांचे हुकुमावरून... दौलत खांरि सालदार याणी तयार केला सन १८४९ इसवी शके १७७१ सौम्यनाम सवत्सरे

Web Title: The stone inscription found on the bridge at Karanje Naka in Satara will be preserved in the Chhatrapati Shivaji Maharaj Museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.