शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘खोटे पोलिस’ खऱ्या पोलिसांना चक्क सापडेनात!, साताऱ्यात दिवसाढवळ्या वृद्धांना लुटतायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:52 IST

गल्लोगल्ली, पेठांमध्येही ‘त्यांचा’ वावर, केवळ सीसीटीव्हीत दिसताहेत

सातारा : सातारा शहरामध्ये मागील काही वर्षांपासून खोटे पोलिस सक्रिय झाले असून, हे पोलिस खरे पोलिस आहेत, असे भासवून नागरिकांना लुटत आहेत. पळून गेल्यानंतर मात्र, त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद होत आहेत. परंतु असे असतानाही खऱ्या पोलिसांना हे खोटे पोलिस कसे सापडत नाहीत, असा प्रश्न सातारकरांमधून उपस्थित केला जात आहे.आम्ही पोलिस आहोत, एवढे दागिने कशाला घातले आहेत. पुढे चोऱ्या-माऱ्या होत आहेत. खून झाला आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगून तोतया पोलिस वृद्धांकडील दागिने घेऊन पसार होत आहेत. दागिने पुडीत बांधण्याचे नाटक करून हातोहात दागिने लांबविले जात आहेत. मागील तीन वर्षांत केवळ सातारा शहर व परिसरामध्ये ११ घटना घडल्या आहेत. यातील दोन घटना उघडकीस आल्या होत्या. परंतु त्यानंतर पुन्हा चोरटे काही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.समाजामध्ये पोलिसांच्या वर्दीचा आजही चांगला धाक आहे. हे जाणून असलेल्या खोट्या पोलिसांनी वृद्धांना आपले लक्ष्य बनवले आहे. सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एकट्या-दुकट्या वृद्धांना वाटेत अडवून त्यांना आम्ही पोलिस आहोत, असे सांगून लुटले जात आहे. सातारा शहरात हे प्रकार विसावा नाका, शाहूपुरी, मंगळवार पेठ, गोडोली आदी परिसरात घडत आहेत.मंगळवार पेठेत रविवारी सायंकाळी पाच वाजता भर वर्दळीच्या ठिकाणी एका ६५ वर्षीय वृद्धाला अशाच प्रकारे लुटण्यात आले. त्यांच्याकडील अंगठी व इतर दागिने घेऊन तोतया पोलिसांनी पलायन केले. या घटनेनंतर पोलिसांनी जिथे हा प्रकार घडला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले. परंतु त्यांच्या दुचाकीचा नंबर मात्र, सीसीटीव्हीत अस्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.गल्लोगल्ली, पेठांमध्येही ‘त्यांचा’ वावरसातारा शहरात सीसीटीव्हीचे जाळे आहे. असे असतानाही हे खोटे पोलिस अजून कसे सापडत नाहीत, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पोलिस असल्याचे भासवून वृद्धांना लुटणारे हे स्थानिकच असण्याची शक्यता आहे. गल्लोगल्ली, पेठांमध्ये त्यांचा वावर असल्याचे अनेकदा सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी