शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra-Goa State Bar Council Elections: वकिलांची ‘कच्ची’ यादी आली, प्रतीक्षा ‘पक्क्या’ मतदार यादीची

By प्रमोद सुकरे | Updated: February 18, 2026 19:28 IST

२६ फेब्रुवारीपासून अर्ज होणार दाखल

प्रमोद सुकरेकराड : गेली दोन-अडीच वर्षे रखडलेल्या महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलची निवडणूक २४ मार्च रोजी होत आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, कच्ची मतदारयादी जाहीर झाली आहे. २६ फेब्रुवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने वकिलांना आता पक्क्या मतदारयादीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. १९ फेब्रुवारी रोजी ही पक्की मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बार कौन्सिलमधील वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुकांनी त्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

खरंतर या निवडणुकीसाठी कार्यक्षेत्र खूपच मोठे असल्याने दोन्ही राज्यात मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांनी यापूर्वीच पायाला भिंगरी लावली आहे. पण, आता कच्ची मतदारयादी व निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाल्याने प्रचाराला अधिक गती आली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील वकिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे बार कौन्सिल कार्यरत राहते. त्यामुळे त्याच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर ५ वर्षांनी याची निवडणूक होते. मात्र, मुदत संपूनही कोरोना संकटामुळे या बार कौन्सिलची निवडणूक झालेली नव्हती. त्यामुळे लांबलेली निवडणूक आता होत असून, प्रक्रियेला वेग आला आहे.

बार कौन्सिलच्या प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर मतदारयादी तयार करताना १९९० नंतरच्या वकिलांची सनद व्हेरिफिकेशन केली जाते. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये घेतले जाते. त्यामुळे मतदारयादी अंतिम करताना बराच वेळ गेला आहे. सुमारे १ लाख ५० हजारांवर मतदार या मतदार यादिीत समाविष्ट असतील, असे सांगितले जाते. अंतिम मतदारयादी समोर आल्यावरच नेमकी मतदार संख्या समजणार आहे.

यंदा प्रथमच महिलांसाठी ३० टक्के आरक्षणया निवडणुकीत २५ उमेदवारांची निवड पसंतीक्रमाच्या मतदान प्रक्रियेद्वारे केली जाते. यावर्षी प्रथमच ३० टक्के महिलांसाठी आरक्षण ठेवल्याने ७ महिला निवडून दिल्या जाणार आहेत. १८ पुरुषांना संचालक मंडळात संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला वकिलांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

न्यायालयात याचिका केली होती दाखलमहाराष्ट्र व गोवा या २ राज्यांतील मतदार वकिलांची संख्या लक्षात घेता या संचालक मंडळाची संख्या २५ वरून ३५ करावी, अशा स्वरुपाची एक याचिका पूर्वीच्या बार कौन्सिलने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. पण, त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे संचालक संख्या पूर्वीप्रमाणेच २५ राहिली आहे.

...असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • अर्ज दाखल करणे- २६ फेब्रुवारी
  • अर्ज छाननी- २८ फेब्रुवारी
  • यादी जाहीर-१ मार्च
  • माघार -२ ते ४ मार्च
  • अंतिम उमेदवार यादी- ४ मार्च मतदान -२४ मार्च
  • निकाल- मतदानानंतर पंधरा दिवसांनी
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra-Goa Bar Council Elections: Lawyers Await Final Voter List

Web Summary : Maharashtra-Goa State Bar Council election on March 24. Lawyers await the final voter list to be published February 19. First time, 30% reservation for women.