शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

माॅर्निंग वाॅकला गेले, चोरट्याने पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटले; जरंडेश्वर नाक्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:19 IST

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : ‘मी पोलीस असून, इथे चोरी झाली आहे. आमची तपासणी सुरू आहे. तुम्ही इकडे या तुम्हाला चेक करायचे,’ आहे असे सांगून एका वृद्धाकडील दागिने घेऊन चोरट्याने पलायन केले. ही खळबळजनक घटना १६ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तानाजी परबती संकपाळ (वय ५९, रा. कुशी दत्तनगर, नागेवाडी, ता. सातारा) हे दोन दिवसांपूर्वी सदर बझार येथे राहणाऱ्या आपल्या मुलाकडे आले आहेत. सोमवारी सकाळी ते जरंडेश्वर नाक्यावरील मारुती मंदिराजवळून ते माॅर्निंग वाॅकला निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून एक युवक तेथे आला. ‘मी पोलीस असून, चोरी झाली असल्यामुळे आमची तपासणी सुरू आहे. तुम्ही इकडे या तुम्हाला चेक करायचे,’ आहे असे म्हणून तानाजी संकपाळ यांना त्याने बोलावून घेतले. त्या चोरट्याने गाडीवर बसूनच संकपाळ यांना तुमच्याकडे दागिने असतील तर या रुमालात ठेवा, असे सांगितले.त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संकपाळ यांनी गळ्यातील साेन्याची चेन आणि अंगठी, मोबाईल काढून त्याच्याजवळ दिले. त्यानंतर त्या चोरट्याने रुमालात दागिने ठेवण्याचा बहाणा करून तो तेथून पसार झाला. पुढे गेल्यानंतर संकपाळ यांनी रुमाल उघडला असता रुमालात केवळ मोबाईल असल्याचे दिसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तानाजी संकपाळ हे सेवानिवृत्त असून, ते तलाठी पदावर कार्यरत होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस