शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: वणव्याने आंबा, नारळ, सुपारी, बाग उद्ध्वस्त; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:10 IST

अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक वणवा लावल्याचा संशय 

पाटण : कोयना विभागातील मारुल तर्फे पाटण येथील प्रभाकर राजाराम सूर्यवंशी यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीकडून रविवारी लावण्यात आलेल्या वणव्यामुळे आंब्याची बाग पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत सुमारे ६०० हून अधिक आंबा, फणस, सुपारी आणि चिकूची झाडे नष्ट झाली असून, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सूर्यवंशी यांनी तीन वर्षांपूर्वी मोठ्या कष्टाने ही बाग उभारली होती. चैत्र महिन्यात आलेल्या पालवीमुळे बाग हिरवीगार आणि बहरलेली दिसत होती. मात्र एका दिवसात लागलेल्या वणव्यामुळे संपूर्ण बाग राखेत परिवर्तित झाली. या आगीत केवळ झाडेच नव्हे, तर ठिबक सिंचन व्यवस्था, पाईपलाइन यांचाही पूर्णतः नाश झाला आहे. शेतकऱ्याने आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे जपलेल्या या झाडांचे झालेले नुकसान पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक वणवा लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रभाकर सूर्यवंशी यांच्याकडून करण्यात येत आहे. या घटनेची माहिती गावकामगार, तहसीलदार, वनविभाग आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.

मी कष्टाने ही बाग उभी केली आहे. यात आंबा, फणस, नारळ, चिकू अशी झाडे लावली आहेत. मात्र अज्ञात व्यक्तीने वणवा लावल्याने उभी केली बाग अचानक नाहीशी झाली त्याचा शासनाने तत्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. - प्रभाकर सूर्यवंशी, आंबा बागायतदार, मारुल तर्फे पाटण

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Wildfire Destroys Orchard, Farmer Suffers Heavy Losses

Web Summary : A wildfire in Patan, Satara, ravaged Prabhakar Suryavanshi's orchard, destroying hundreds of mango, jackfruit, and chikoo trees. The farmer, who painstakingly cultivated the orchard, suffered significant financial losses, including damage to irrigation systems. An investigation is underway to determine the cause of the fire.