शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

साताऱ्यातील खिरखंडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार, शिक्षणासाठी होडीतून करावा लागायचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:07 IST

खिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते.

बामणोली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा (कोअर) क्षेत्रात आणि कोयना धरणाच्या पलीकडील बाजूस असलेल्या खिरखंडी गावातील मुलांना शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून होडी चालवीत शाळेला जावे लागत होते. याबाबत उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन गावात दाखल झाले. प्रशासनाने विद्यार्थ्यांची आश्रमशाळेमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली आहे, तर ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.उच्च न्यायालयाने कायमस्वरुपी उपाययोजन करण्यास सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सहाय्यक बन संरक्षक सुरेश साळुंखे, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत कर्णे, वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, राम पवार, विजय देशमुख,अशोक मनुकर, दीपक भुजबळ आदी उपस्थित होते.जावळी तालुक्यात खिरखंडी गाव आहे. या गावामध्ये पूर्वी ७० कुटुंबे वास्तव्यास होती. कोयना धरणाच्या निर्मितीमुळे या गावाचे ठाणे जिल्ह्यातील एकसाल सागाव (ता. भिवंडी) या गावामध्ये पुनर्वसन झाले. तथापि पुनर्वसन झाल्यानंतरही ७० पैकी ६ कुटुंबांनी पुनर्वसन झालेल्या गावातील जमीन ताब्यात घेतली नाही. एका कुटुंबाने पुनर्वसनाच्या ठिकाणची जमीन ताब्यात घेतली आहे. परंतु, या कुटुंबातील काही व्यक्ती खिरखंडी येथेच वास्तव्यास आहेत. सद्य:स्थितीत सात कुटुंबे पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये स्थलांतरित न होता खिरखंडीत वास्तव्यास आहेत.

पालकांचे मन वळविण्यात प्रशासनाला यशखिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते. प्रशासनामार्फत या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू होते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना लाँचने अथवा पायी प्रवास करावा लागणार नाही. या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी विद्यार्थी आणि पुनर्वसनाबाबत चर्चा केली, या प्रयत्नांना यश आले आहे.

सध्या खिरखंडी ग्रामस्थ येथे खूप वाईट परिस्थितीत राहत असून, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावत आहे. आम्ही त्यांची नजीकच्या आश्रम शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्नही येत्या आठ दिवसांत कायमचा मार्गी लावणार आहे. - रुचेश जयवंशी - जिल्हाधिकारी, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी