शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

Satara: कास धरण भरल्याने सांडव्यावरून वाहू लागले पाणी!, गतवर्षीपेक्षा दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:27 IST

सातारकरांची पाण्याची चिंता मिटली

पेट्री : शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण आठवडाभरापासून मुसळधार पावसाने पूर्णक्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून शनिवारी रात्री नऊ वाजता मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून सातारकरांची पाण्याची चिंता मिटली. कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होऊन भांबवली, एकीव धबधबा मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे.शहराला दररोजचा पाणीपुरवठा, वातावरणातील उष्णतेमुळे आत्तापर्यंत एकूण सोळा फूट पाणीपातळीत घट होऊन मे महिन्याच्या अखेरीस पाणीपातळी ४५ फुटावर होती. मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यानंतर धरणातील पाणीसाठ्यात एक फूट त्यानंतर चार फूट त्यानंतर पाच फुटाने वाढ झाली. मागील तीन दिवसांच्या पावसात सरासरी दिवसाला एकेक फुटाने पाणीसाठ्यात वाढ झाली. सद्य:स्थितीला धरणात एकूण ६१.०४८ फूट पाणीसाठा झाला. सड्यावरून पाणी वाहून ओढे, नाले, झरे मोठ्या प्रमाणावर वाहत मुसळधार पावसाने शनिवारी रात्री कास धरण ओव्हरफ्लो झाले.

मान्सूनच्या वेळेत आगमनाने गतवर्षीपेक्षा सतरा दिवस अगोदर दमदार पावसाने कास धरण ओव्हरफ्लो झाले. परिसरात मुसळधार पाऊस पडून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. मुसळधार पावसामुळे अर्धा टीएमसी पाणीसाठ्याचे कास धरण पूर्णपणे भरले. धरणाची उंची वाढवल्याने पूर्वीपेक्षा मागील वर्षीपासून पाचपट अधिक पाणीसाठा होत आहे. सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. सांडव्यावरून एक फूट पाणी वाहत आहे, अशी माहिती अशोका स्थापत्यचे अभियंता बद्रिनाथ देटे यांनी दिली.पाणीपातळीत वाढ गतवर्षीपासून एकंदरीत ७८.७२० फूट पाणीसाठा धरणात होत आहे. त्यापैकी पावणेअठरा फूट मृत पाणीसाठा आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ६१.०४८ फूट पाणीसाठा झाला आहे. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता देखील जास्त होती. त्यामुळे पंधरा ते सोळा फूट पाणीपातळी खालावली होती. परंतु, वेळेत मान्सूनला दमदार सुरुवात झाल्याने पाणीपातळीत वाढ होण्यास लवकर मदत झाली.

मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीपातळीत आठवडाभरात पूर्णतः वाढ होऊन यंदा पाणीसाठा ०.५० टीएमसी झाला आहे. गतवर्षीपेक्षा सतरा दिवस अगोदर धरण ओव्हरफ्लो झाले. -जयराम किर्दत, पाटकरी, कास धरण

कास धरण पूर्ण क्षमतेने वाहिले! (२०फूट पाणीसाठा असताना)सन२०१५-२३जूनसन२०१६-३जुलैसन२०१७-३०जूनसन२०१८-५जुलैसन२०१९-६जुलैसन२०२०-४जुलैसन२०२१-१७जूनधरणाची उंची वाढवल्यानंतर(पन्नास फूट पाणीसाठा असताना)सन२०२२-१५जुलै मध्यरात्रीसांडव्याची उंची अधिक वाढवल्यानंतरसन२०२३-२४जुलैसन २०२४-७ जुलै

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारWaterपाणीRainपाऊस