शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Satara: वाहन बाजूला घेण्यास सांगितले, हॉटेल मालक, व्यवस्थापकाला १०-१५ तरुणांनी चोपले; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 19:54 IST

मुराद पटेल  शिरवळ : हॉटेलसमोर लावलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन १०-१५ तरुणांनी हॉटेल मालक, व्यवस्थापकासह दोघांना बेदम चोपले. ...

मुराद पटेल शिरवळ : हॉटेलसमोर लावलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन १०-१५ तरुणांनी हॉटेल मालक, व्यवस्थापकासह दोघांना बेदम चोपले. तलवार फिरवत शिवीगाळ, काठ्या, हाँकी स्टिकने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. सागर पोपट जाधव (वय ३७) व एकनाथ पोपट शिंदे अशी जखमींची नावे आहेत. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पुणे, सातारा जिल्ह्यातील पंधरा जणांविरोधात शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिदेंवाडी गावच्या हद्दीत लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर पोपट जाधव (वय ३७) यांच्या कुंटूंबियांचे हॉटेल व बिअरशॉपी आहे. काल, शुक्रवार हॉटेलसमोर मोकळ्या जागेमध्ये एका ट्रकचालकाचा वाद सुरु होता. दरम्यान सागर यांनी संबंधितांना हॉटेलसमोरील वाहन बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी संबंधित चालकाने शिवीगाळ केली. तसेच सायंकाळी १०-१५ तरुणांना घेवून पुन्हा हॉटेल समोर आला. व्यवस्थापक एकनाथ शिंदे यांनी सागर जाधव यांना फोनवरुन माहिती देताच ते हॉटेलमध्ये आले. यावेळी संचित शिळीमकर, सौरभ शिळीमकर, विनीत शिळीमकर, अमोल शिळीमकर (सर्व रा.ताबांड ता.भोर जि.पुणे), सौरभ पिसाळ (पिसाळवाडी ता.खंडाळा), ऋषी कोंडे व इतर आठ ते नऊ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करुन काठ्या, हाँकी स्टिक, टाँमीने सागर जाधव व एकनाथ शिंदे यांनाही बेदम मारहाण करीत हॉटेल व बिअर शॉपीची तोडफोड केली. यात सागर जाधव, एकनाथ शिंदे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस