शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

उन्हामुळे सोयाबीन पिकाला फटका, शेतकऱ्यांच्या स्वप्नाला बसला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:50 IST

चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असून, यंदा उन्हाळ्यातही पीक घेण्यात आले होते.

नितीन काळेलसातारा : चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असून, यंदा उन्हाळ्यातही पीक घेण्यात आले होते. मात्र, कडक उन्हामुळे फुलगळ होऊन उत्पादन, तसेच दर्जावरही परिणाम झाला, तर परिपक्व सोयाबीन नसल्याचा फायदा घेत व्यापारीही कमी दराने खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मालामाल होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम महत्त्वाचे असतात. यामध्ये खरीप हंगाम सर्वांत मोठा असतो. या हंगामातील ऊस वगळून जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरवर असते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर राहते, तर सोयाबीन ६३ हजार, भात ४९ हजार, भुईमूग ३८ हजार, ज्वारी २४ हजार, मका १८ हजार आणि नाचणी ६ हजार हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र राहते. आतापर्यंत खरीप हंगामातच सोयाबीनचे पीक घेण्यात येत होते; पण बदलत्या काळात शेतकरी आता वर्षात ‘डबल बार’ उडवून देऊ लागले आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन घेण्यात येते. याचे सर्वसाधारण क्षेत्र ६३ हजार हेक्टर असले तरी त्यामध्ये वाढ होत आली आहे. गेल्या पाच वर्षांत खरीप सोयाबीन क्षेत्रात जवळपास १५ हजार हेक्टरची वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी खरिपात ७४ हजार हेक्टरवर पेरणी झाली, तर खरिपानंतर उन्हाळ्यातही ९ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक घेऊन ‘डबल बार’ उडवून दिला होता. या तालुक्यांत १,७६१ हेक्टरवर पीक होते. यामध्ये माण आणि महाबळेश्वर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांत सोयाबीन होते. यावर्षी कडक उन्हाळा होता. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर उत्पादित सोयाबीन लहान राहिल्याने दर्जा राहिला नाही. परिणामी व्यापारी कमी दराने मागत आहेत.सध्या खरिपातील सोयाबीनला ६,५०० पर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर उन्हाळी सोयाबीनची ५,५०० ते ६ हजारांपर्यंत विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत आहे, तसेच मोठ्या अपेक्षेने उन्हाळ्यात सोयाबीन घेऊनही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह मावळला आहे.उन्हाळी सोयाबीन क्षेत्र  तालुका क्षेत्र हेक्टरमध्येसातारा                  ४८५जावळी                 २१पाटण                   ३५कऱ्हाड                 २१६कोरेगाव                १३०खटाव                  १५१फलटण                 ३७६खंडाळा                 ८७वाई                     २६०

शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन पीक घेतले होते; पण, कडक उन्हाळ्यामुळे फुलगळ झाली, दर्जावर परिणाम झाला. याचाच गैरफायदा घेत व्यापारी उन्हाळी सोयाबीनला कमी दर देत आहेत. वास्तविक पाहता सोयाबीन तेलाचा दर अजूनही तेजीत आहे. त्यामुळे सोयाबीनला कमी दर मिळणे शेतकऱ्यांचा तोटा आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी