शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: किल्ले अजिंक्यताऱ्यावर अवतरला शाहू काल, पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:59 IST

ढोल-ताशांचा कडकडाट, सनईचे मंजूळ स्वर आणि तुतारीच्या ललकारीने आसमंत भारावून गेला

सातारा : सातारा नगरीचे निर्माते छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण इतिहास सोमवारी किल्ले अजिंक्यताऱ्यावर पुन्हा एकदा जिवंत झाला. ढोल-ताशांचा कडकडाट, सनईचे मंजूळ स्वर आणि तुतारीच्या ललकारीने आसमंत भारावून गेला. निमित्त होते सातारा स्वाभिमान दिनाचे. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने आयोजित या १५व्या सोहळ्याने गडावर शाहू काल अवतरल्याची प्रचिती आली.किल्ले अजिंक्यताऱ्यावर सोमवारी (दि. १२) छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून सोमवारी सकाळी गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गडाचे मुख्य महाद्वार आणि बुरुजांना फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली होती. सकाळी ८ वाजता शाहू महाराजांच्या मूर्तीची फुलांनी सजवलेल्या पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.चामर आणि अबदागिरीच्या लव्याजम्यात निघालेल्या या पालखी सोहळ्यावर शिवभक्तांनी फुलांचा वर्षाव केला. राजसदरेवर हा सोहळा पोहोचल्यानंतर शिवभक्तांचा शिगेला पोहोचला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, दीपक प्रभावळकर ज्यांच्यासह हजारो शिवभक्त सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले...अशी ही सामाजिक बांधिलकी..छत्रपती शाहू महाराजांच्या सर्वसमावेशक धोरणांचा वारसा या सोहळ्यातही जपण्यात आला. औरंगजेबाची कन्या झिनतउन्नीसा यांनी महाराजांना कैदेत असताना मातृवत प्रेम दिले होते, त्यांच्या स्मरणार्थ शाहूनगरीत मशीद उभारण्यात आली होती. या इतिहासाची स्मृती म्हणून पालखी सोहळ्यात मुस्लिम बांधवांना विशेष मान देण्यात आला. तसेच, मंगळाई देवीच्या मंदिरात महिलांनी स्वतःच्या खांद्यावर पालखी घेऊन गडाच्या परंपरेला नवा आयाम दिला.पारंपरिक वाद्यांचा गजरकिल्ल्यावरील रत्नेश्वर मंदिर आणि मंगळाई मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले. गुरुकुल स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सनी महाराजांच्या पालखीला मानवंदना दिली. सनई-चौघड्यांच्या निनादात आणि भगव्या ध्वजांच्या सावलीत हजारो सातारकरांनी हा स्वाभिमान सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. सोहळ्यानंतर गडावर वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेशही देण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shahu Era Recreated at Ajinkyatara Fort; Palkhi Procession Celebrates Heritage

Web Summary : Satara Swabhiman Din celebrated at Ajinkyatara Fort with traditional music and Palkhi procession, recreating Chhatrapati Shahu Maharaj's era. The event included honoring inclusive policies and environmental initiatives with thousands of devotees in attendance.