शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पाऊस अन् थंडीचा सामना करत डोंगरातील वीजपुरवठा केला सुरळीत, महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 14:49 IST

मुसळधार पावसामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने तापोळा परिसरातील विजेचे २० खांब कोसळले होते

सातारा : काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने तापोळा परिसरातील विजेचे २० खांब कोसळले. यामुळे वलवण, शिंदी व चकदेव या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाऊस, थंडीचा सामना करत १० खांब उभे करण्यात यश मिळवले. त्यामुळे लवकरच सर्व खांब उभे करुन वीजपुरवठा सुरु होणार आहे.महावितरणच्या मेढा उपविभागांतर्गत तापोळा शाखा येते. परिसरातील १०५ गावांतील ५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचे काम तापोळा शाखेचे कर्मचारी करतात. गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून विजेच्या तारांवर पडले. परिणामी तापोळा वीज उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या शिंदी या २२ केव्ही वाहिनीचे २० लोखंडी खांब कोसळले. त्यामुळे शिंदी, वलवण आणि चकदेव या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. या गावात एकूण १३० ग्राहक आहेत. त्यांना तीन रोहित्रावरुन वीजपुरवठा केला जातो.विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वाई उपविभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर व मेढ्याचे उपकार्यकारी अभियंता सचिन बनकर यांनी तापोळा शाखेला विजेचे खांब, सर्व साहित्य व ठेकेदाराची दोन पथके पाठवली. तापोळ्याचे शाखा अभियंता सागर शेळके, स्थानिक वायरमन किरण माने व इतर कर्मचाऱ्यांसह वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.मात्र, ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या वृक्षांमुळे व धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. यावरही मात करुन १० खांब उभे करण्यात यश आले आहे. रविवारी पावसाने उसंत घेतल्यामुळे कामाची गती वाढली असून, लवकरात लवकर उर्वरित खांब उभे करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे व अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

दरवर्षी वीजपुरवठा खंडितच्या घटना...

सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा डोंगरदऱ्याचा आहे. कास, बामणोली, तापोळा या भागात पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी होते. तसेच वारेही वाहतात. त्यामुळे झाडे पडतात. परिणामी वीजपुरवठा खंडित होतो. यासाठी महावितरणला सतत दक्ष राहावे लागते. तसेच वीजपुरवठाही सुरळीत करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरelectricityवीजmahavitaranमहावितरणRainपाऊस