इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शॉक, युवतीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:48 IST2022-05-21T14:42:49+5:302022-05-21T15:48:37+5:30

कऱ्हाड : इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवानी अनिल पाटील (वय २३) असे ...

The charging of the battery of an electric bike caused shock, the unfortunate death of a young woman in karad | इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शॉक, युवतीचा दुर्दैवी मृत्यू

इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शॉक, युवतीचा दुर्दैवी मृत्यू

कऱ्हाड : इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवानी अनिल पाटील (वय २३) असे मृत्यू युवतीचे नाव आहे. कऱ्हाड तालुक्यातील म्होप्रे येथे काल, शुक्रवारी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील शिवानी पाटील ही युवती इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर करीत होती. शुक्रवारी बाहेरगावी जाणार असल्यामुळे दुचाकीच्या बॅटरीचे चार्जिंग तपासले. चार्जिंग कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवानीने दुचाकीची बॅटरी काढली.

बॅटरी चार्जला लावण्यासाठी ती घरामध्ये गेली; मात्र चार्जला लावत असताना अचानक शिवानीला शॉक लागला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. नातेवाइकांनी तिला उपचारार्थ रुग्णालयात हलवले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

Read in English

Web Title: The charging of the battery of an electric bike caused shock, the unfortunate death of a young woman in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.