शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन, वारसा स्थळ, आरोग्यक्षेत्राला ‘बूस्टर’ !; अर्थसंकल्पात साताऱ्याला झुकते माप, मुनावळे-वासोटा ‘रोपवे’ची भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:26 IST

पर्यटनवाढीला चालना तर रोजगाराच्याही संधी

सातारा : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विकसित महाराष्ट्राचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील शेतकरी, पर्यटन, वारसास्थळांचे जतन, आरोग्य या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. या शिवाय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र तसेच महात्मा फुले यांचे जन्मगाव असलेल्या कटगुण (ता. खटाव) येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.

मुनावळे-वासोटा ‘रोपवे’ची भरारीसातारा : सह्याद्रीच्या घनदाट अरण्यात आणि कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक किल्ले वासोटा आता पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित होणार आहे. शुक्रवारी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनावळे ते वासोटा रोपवे या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील पर्यटनाला आता जागतिक स्तरावरील मोठी ओळख प्राप्त होणार असून, स्थानिकांसाठी रोजगाराची कवाडे उघडली जाणार आहेत.किल्ले वासोटा हा दुर्गप्रेमी आणि निसर्गवेड्या पर्यटकांच्या कायमच पसंतीस उतरतो. दरवर्षी हजारो पर्यटक येथील जलसफारी आणि थरारक जंगल सफारीचा अनुभव घेण्यासाठी वासोट्याला भेट देत असतात. मात्र, हा किल्ला सर करणे तसे सोपे काम नाही. बामणोली किंवा मुनावळे येथून बोटीने प्रवास केल्यानंतर साधारण दोन ते अडीच तास घनदाट झाडीतून, दगडधोंड्यांच्या आणि निसरड्या पायवाटांवरून पायपीट करावी लागते. हा प्रवास करताना पाय घसरून अपघात होण्याची भीती असते. पर्यटकांच्या याच समस्यांना पूर्णविराम देण्यासाठी शासनाने आता ‘रोपवे’चा मास्टरप्लॅन आखला आहे.या प्रकल्पामुळे पर्यटकांना काही मिनिटांतच किल्ले वासोटा गाठता येईल. उंचावरून सह्याद्रीचा थरार, घनदाट जंगल आणि कोयना जलाशयाचा विहंगम नजारा अनुभवणे हा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. या आधुनिक रोपवेमुळे वृद्ध आणि लहान मुलांनाही आता सहजपणे हा ऐतिहासिक किल्ला पाहता येईल.

दरे येथे निसर्गोपचार केंद्रउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या मूळगावी अद्यावत निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या केंद्रामुळे कोयना परिसरातील निसर्ग पर्यटनाला आता आरोग्याची जोड मिळणार असून, स्थानिकांना शाश्वत रोजगार मिळण्यास मदत होईल. मुनावळे ते वासोटा रोपवे आणि दरे येथील निसर्गोपचार केंद्र या दोन्ही प्रकल्पांमुळे संपूर्ण कोयना-कांदाटी खोऱ्याचा कायापालट होणार आहे. पर्यटनवाढीसोबतच या दुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासाला यामुळे मोठी गती मिळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Budget Boosts Tourism, Heritage, Healthcare; Munawale-Vasota Ropeway Soars

Web Summary : Satara's budget prioritizes tourism, heritage, and healthcare, featuring a Munawale-Vasota ropeway. Development includes Naygaon and Katgun memorials, plus a Dare nature cure center, boosting local employment and transforming the Koyna-Kandati region.