शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘काशीनाथाचं चांगभलं' चा गजर; लाखो भाविकांच्या साक्षीने रंगला बावधनचा बगाड सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:29 IST

मागील पाच दिवसांपासून ते गावातील सर्व मंदिरांत पूजा करून मंदिरातच मुक्कामाला असतात

बावधन : 'काशीनाथाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी साडेअकराच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. बावधनकरांच्या याच श्रद्धेमुळे गेल्या चार-पाच वर्षांत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर परराज्यांतून हजारो भाविक यात्रेस भेट द्यायला येताहेत.बगाड मिरवणूक पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने यात्रेकरू जमा झाले होते. सर्व शिवार आणि रस्ते बगाड ओढणारे बैल आणि यात्रेकरू ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले होते. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन येथील भैरवनाथ मंदिरात यावर्षीचा बगाड्या निवडण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. यावर्षीचा बगाडाचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे.मागील पाच दिवसांपासून ते गावातील सर्व मंदिरांत पूजा करून मंदिरातच मुक्कामाला असतात. शनिवारी रात्री बावधन येथे ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत मोठी शाही छबिना मिरवणूक निघाली होती. या छबिण्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेकरू सहभागी झाले होते.सकाळी बगाड्याला आणि बगाडाचा रथ कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वर येथे आणण्यात आला. तिथे ग्रामदेवतेच्या पूजा झाल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास बगाड्याला बगाडाला टांगण्यात आले.धुष्टपुष्ट बैलांच्या मदतीने दगडी चाकांचे तीन-चार टन वजनाचा बगाडाचा रथ बैलांच्या मदतीने ओढून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवारनिहाय व तरफनिहाय ठिकठिकाणी सहा ते बारा बैल जुंपून बगाडाचा रथ शेत शिवारातून ओढून बावधन गावात भैरवनाथ मंदिराकडे आणला गेला.बगाड रथ नियोजनात सुसूत्रता...बगाड रथाच्या मागे अन् पुढे भैरव देव देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळ बावधन यांच्या वतीने ध्वनिक्षेपाच्या साहाय्याने बगाडाला बैल जुंपणे, बैल बदलणे, तसेच आवश्यक सूचना तसेच आवश्यक नियोजन केले जात असल्याने बगाड रथ नियोजनात सुसूत्रता येत होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे तसेच पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.

वैद्यकीय पथक याठिकाणी दाखलसातारा जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल करण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील तत्पर सेवा देण्यासाठी सज्ज होते. वाई सातारा रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ, खेळण्यांची दुकाने लागली आहेत. काशीनाथाच्या चांगभलंच्या गजरात रात्री ८ वाजता बगाड श्री काळभैरवनाथ मंदिरात पोहोचले. किरकोळ दुखापत वगळता यात्रा सुरळीत पार पडली.