टीईटी पात्र शिक्षक नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:09+5:302021-06-22T04:26:09+5:30
सातारा : साताऱ्यातील खासगी शाळांनी कमी पगारात अपात्र शिक्षक नेमून मुलांचे शिक्षण उरकण्यापेक्षा टीईटी पात्र शिक्षक नेमावेत आणि मुलांचे ...

टीईटी पात्र शिक्षक नेमा
सातारा : साताऱ्यातील खासगी शाळांनी कमी पगारात अपात्र शिक्षक नेमून मुलांचे शिक्षण उरकण्यापेक्षा टीईटी पात्र शिक्षक नेमावेत आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात टीईटी म्हणजेच मुलांना शिकविण्यास पात्र आहेत का हे पाहणं आवश्यक आहे. १३ फेब्रुवारी २०१३ च्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्व खाजगी शाळांनी टीईटी पात्र शिक्षकांनाच खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नेमावे, अपात्र शिक्षकांना नेमू नये, असा शासन निर्णय आहे. टीईटीपात्र नसलेल्या शिक्षकांना तुटपुंज्या पगारावर राबवून खाजगी शाळा प्रशासन विद्यार्थीवर्गाचे अक्षम्य नुकसान करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.