शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला भीषण आग

By admin | Updated: December 16, 2014 23:40 IST

शिरवळ येथील घटना : २० लाखांचे नुकसान; आगीबाबत उलट-सुलट चर्चा

शिरवळ : शिरवळ, (ता. खंडाळा) येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिराजवळ लावलेल्या डॉल्बी सिस्टीमच्या टेम्पोला आग लागून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला आग लागली की लावण्यात आली? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याबाबतची पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील करन विश्वास कुचेकर यांच्या मालकीची साई डिजीटल-डॉल्बी म्युझिक सिस्टम नावाची डॉल्बी सिस्टीम आहे. सदर डॉल्बी सिस्टीम टाटा टेम्पो (एमएच ०६ के. ४५६१) यावर बसविण्यात आली आहे. काल (सोमवार दि. १५) शिरवळ येथील एक लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकून सदरची डॉल्बी सिस्टीम बसस्थाणक परिसरातील दत्त मंदिराजवळ लावण्यात आली होती. यावेळी करण कुचेकर यांनी रात्री ८ च्या सुमारास गाडीजवळ येऊन टेम्पो १० मिनिटे सुरू केले. त्यानंतर टेम्पो बंद करुन टेम्पोमधील बॅटरीच्या वायरी बॅटरीपासून दुर केल्या व काचा लावत घरी झोपण्यासाठी गेले. पहाटे तीनच्या सुमारास संबंधीत डॉल्बी सिस्टिमला आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने खाजगी टँकरच्या सहाय्याने टेम्पोला लागलेली आग विजविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात नागरिक व पोलीसांना यश आले. मात्र, तोपर्यंत अगीत टेम्पोचे, म्युझिक सिस्टमचे, साऊंड, एम्पलीफायर मशीनचे, एअर कंडिश्नर, जनरेटर, इलेक्ट्रीक साहत्य जळून खाक झाले. आगीत डॉल्बी सिस्टीमचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदान व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, डॉल्बी सिस्टीमला आग लागली की लावण्यात आली? याबाबत साशंकता निर्माण झाली असून याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या घटनेची नोंद शिरवळ पोलीस दुरक्षेत्रात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार रफिक पटेल करीत आहेत. (प्रतिनिधी)ग्रामस्थांना अग्निशमन बंबांची प्रतीक्षा...शिरवळ व परिसरातमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत असताना या ठिकाणी आगीसारख्या दुर्घटना सतत घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरवळजवळील भंगाराच्या दुकानाला आग लागून लोखोंचे नुकसान झाले होते. तर महामार्गावर ट्रक जळून खाक झाला होता. याठिकाणी अग्निशमन बंब नसल्याने मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीने प्रशानाकडे अग्निशमन बंबासाठी प्रस्ताव देऊनही याकडे दुर्लक्ष झाले असून हा प्रस्ताव कित्येक महिने जिल्हाधिकारी कार्यालयात धुळखात पडला आहे. याठिकाणी लवकरात-लवकर अग्निशमन बंब उपलब्ध करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.