शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: हुल्लडबाजांची विकृती!, परीक्षेतील यशस्वी मुलींचे फलकावरील फोटोच नेले फाडून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 13:09 IST

निर्भया पथकाकडून हुल्लडबाजांवर कारवाई

कऱ्हाड : अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत असतानाच परीक्षेत यश मिळविल्याबद्दल मुलींच्या कौतुकासाठी लावण्यात आलेल्या फलकावरील मुलींचे फोटो फाडून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मलकापूरच्या आगाशिवनगर परिसरात घडली आहे. संबंधित मुलींच्या पालकांनी तसेच शाळेने याबाबतची तक्रार दिल्यानंतर निर्भया पोलिस पथकाने संबंधित हुल्लडबाजांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली.मलकापूर शहरातील एका स्कूलमधे प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या कौतुकाचे फलक स्कूलने परिसरात लावले होते. या फलकावर पाच ते सहा गुणवत्ताधारकांचे फोटो लावले होते. मात्र, हुल्लडबाज मुलांनी संबंधित फलकावरील मुलींचे फोटो कापून ते घेऊन गेले. हा प्रकार पालकांसह स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी संताप व्यक्त करत पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. स्कूल प्रशासनानेही याची दखल घेत पोलिसांना कारवाईबाबतचे पत्र दिले. उपअधीक्षक ठाकूर यांनी तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या.सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या दीपा पाटील, अमोल फल्ले, संतोष सपाटे, सागर बर्गे, प्रवीण पवार, दीपक कोळी यांनी फलक फाडणारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संबंधित मुली रस्त्यावरून जाताना ही मुले लपून मोबाइलवर त्यांचे फोटो काढत असल्याचेही पोलिस चौकशीत समोर आले. संबंधित मुलांसह त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मुलांकडे पोलिसांनी याबाबत चौकशी करून कडक शब्दात समज दिली.तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या घटनेची गंभीर दखल घेतल्याने मुलींचे पालक नाहक मनस्तापातून बाहेर पडले. फलकावरील फोटो फाडणाऱ्या मुलांसह त्यांच्या साथीदारांवर कारवाई करणार असल्याचे निर्भया पथकाच्या पोलिस दीपा पाटील यांनी सांगितले.

मध्यस्थीसाठी महिलेची धावाधावफलक फाडून मुलींचे फोटो काढून नेणाऱ्या मुलाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी तसेच मध्यस्थी करण्यासाठी एक महिला पोलिस ठाण्यात आली होती. मुलांना पाठीशी घालत त्यांच्यावर कारवाई होऊ नये, म्हणून त्या महिलेचे प्रयत्न सुरू होते. मात्र, पोलिसांनी त्या महिलेला कडक शब्दात समज दिल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस