शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रे फाडून अंगणवाडीत चोरी

By admin | Updated: April 10, 2015 00:29 IST

कवठे-केंजळ : दोन महिन्यांपूर्वी शाळेतील कार्यालयातही झाली होती तोडफोड

मसूर : कवठे (केंजळ), ता. कऱ्हाड येथे अंगणवाडी क्र. ८५ चे कुलूप तोडून आतील हजारोंचा माल गायब करण्यात आला आहे. तसेच कागदपत्रे फाडण्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. यामुळे कवठे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी येथील शाळेत तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, कवठे (केंजळ) येथील अंगणवाडी क्र. ८५ चे कुलूप तोडून अज्ञातांनी साहित्याची नासधूस करत आयसीडीएसची सर्व रजिष्टरे फाडून टाकली आहेत. तर एक वजनकाटा चोरून नेला तर दुसरा तेथेच फोडून टाकला आहे. तसेच स्टिलच्या डीश व दहा ग्लास चोरीला गेले आहेत. टेबलचा ड्रावर उघडून आतील साहित्य विस्कटून टाकले आहे. दवाखान्याने दिलेली तापमापीही फोडून टाकली आहे. महत्त्वाची रजिष्टरे फाडल्याने नुकसान झाले आहे.याच गावामध्ये फेब्रुवारी महिन्यात श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाच्या कार्यालयामधील संगणक व प्रिंंटर, खुर्च्यांची मोडतोड करत कागदपत्रे वाहत्या पाण्यात फेकल्याची घटना घडली होती. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील, सरपंच सुमन यादव, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग यादव, माजी सरपंच लहूराज यादव, संभाजीराव यादव तसेच ग्रामस्थांनी पाहणी केली. मसूरच्या पोलीस दूरक्षेत्राच्या उपनिरीक्षक रेखा दूधभाते, हवालदार सुधाकर भोसले, एस. जे. घाडगे, एस.पी. साळुंखे यांनी भेट देऊन पहाणी केली. मसूर पोलीस दूरक्षेत्रात रात्री उशिरापर्यंत तक्रार घेण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)$$्रिपोलिसांनी लवकर तपास करावा...श्री ज्योतिर्लिंग विद्यालयात अज्ञाताने केलेल्या मोडतोडीच्या घटनेस जवळपास दोन महिने पूर्ण झाले तरी अजून आरोपी सापडले नाहीत. तोपर्यंतच अशी घटना अंगणवाडीत घडली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या समाजविघातक वृत्तींना ठेचून पुढे आणल्याशिवाय अशा घटना बंद होणार नाहीत. त्यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून या घटनेचा पर्दाफाश करावा.- लहूराज यादव, कवठे