शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेला ढकलून गळ्यातील चार लाखांची चेन हिसकावली, साताऱ्यात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:31 IST

सातारा : सातारा शहरात सोनसाखळी हिसकावणारे चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, एका शिक्षिकेला पाठीमागून येऊन ढकलून देऊन त्यांच्या गळ्यातील ...

सातारा : सातारा शहरात सोनसाखळी हिसकावणारे चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, एका शिक्षिकेला पाठीमागून येऊन ढकलून देऊन त्यांच्या गळ्यातील तब्बल ४ लाख २२ हजारांची चेन हिसकावून नेली. ही घटना दि. १७ रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास राजवाड्यावरील राजधानी टाॅवरजवळ घडली.आशादेवी अजित साळुंखे (वय ४८, रा. नागठाणे, ता. सातारा) या शिक्षिका आहेत. सोमवार, दि. १७ रोजी दुपारी त्या राजवाड्यावरील राजधानी टाॅवर्सजवळून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून एक अनोळखी तरुण आला. त्याने तोंडाला काळा रुमाल बांधला होता. अचानक त्याने साळुंखे यांना ढकलून दिले. त्यानंतर चोरट्याने काही क्षणात त्यांच्या गळ्यातील ४ लाख २२ हजार रुपयांची ६५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली. या प्रकारानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत चोरटा तेथून पळून गेला. भर वर्दळीच्या ठिकाणी एका शिक्षिकेला अशाप्रकारे ढकलून त्यांची चेन चोरून नेल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिथे ही घटना घडली. त्या ठिकाणी पंचपाळी मंदिर आहे. या ठिकाणी दर्शनासाठी महिला येत असतात. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सीसीटीव्हीलाही देताहेत चकवा..सातारा शहरामध्ये अधूनमधून सोनसाखळी चोरटे सक्रिय होत आहेत. एकदा चोरी झाली की पुन्हा दोन महिने सोनसाखळी चोरी होत नाही. दोन महिन्यांनंतर पुन्हा चोरटे सक्रिय होत आहेत. शहरात बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही असतानाही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाहीत. काही चोरटे दुचाकीवरून येऊन मंगळसूत्र हिसकावून जाताहेत तर काही चालतही दागिने हिसकावताहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस