अंगावर रॉकेल ओतून शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 14:33 IST2018-05-25T14:33:23+5:302018-05-25T14:33:23+5:30

शिक्षण संस्थाचालकांनी केलेले निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी एका शिक्षकाने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या केबिनबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

teacher attempted suicide outside the collector office | अंगावर रॉकेल ओतून शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

अंगावर रॉकेल ओतून शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा : शिक्षण संस्थाचालकांनी केलेले निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी एका शिक्षकाने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या केबिनबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अनिल दत्तात्रय गायकवाड (वय, ५०, रा. सातारा) असे आंदोलकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, अनिल गायकवाड हे खटाव तालुक्यातील राजापूर येथील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. संस्था चालकांनी त्यांना कामात अनियमितताचे कारण देऊन निलंबित केले होते. हे निलंबन रद्द करण्याची त्यांची मागणी होती. त्यातून त्यांनी शुक्रवारी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Web Title: teacher attempted suicide outside the collector office