शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द; तालुकाप्रमुखाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 12:29 IST

कऱ्हाड : सोशल मीडियावर उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ...

कऱ्हाड : सोशल मीडियावर उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेच्या तालुकाप्रमुखावर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकासाहेब जाधव (रा.मुंढे, ता. कऱ्हाड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, रविवारी पोलिसांनी त्याला अटक केले आहे.याबाबत गुलाबराव गणपतराव शिंदे-पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपवर ‘शिवसेना एकनाथ शिंदे’ नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये शिंदे गटातील पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते आहेत. शिवसेनेचा कऱ्हाड तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव हाही त्या ग्रुपमध्ये आहे.शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब जाधव याने संबंधित सोशल मीडिया ग्रुपवर पालकमंत्री शंभुराज देसाई यांना उद्देशून अपशब्द वापरले. अश्लील भाषेत त्याने त्या ग्रुपवर शिवीगाळ केली. संबंधित ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना, तसेच इतरांना लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वापरून त्याने मंत्री देसाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.काकासाहेब जाधव याने माहिती तंत्रज्ञान उपकरणाचा गैरवापर करून मंत्री देसाई यांना अपशब्द वापरत जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार गुलाबराव शिंदे यांनी रविवारी पहाटे कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी काकासाहेब जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस