शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

तलाठी शहरातून पाहतात गावचा कारभार, शेतकऱ्यांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:40 IST

talathi, satara, ruralarea पाटण तालुक्यातील तलाठ्यांची त्यांच्या सजातील उपस्थिती हा चर्चेचा विषय आहे. विभागातील अनेक गावांतील तलाठी नेमणूक असलेल्या गावात न थांबता तालुक्यावरूनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची परवड होत आहे.

ठळक मुद्देतलाठी शहरातून पाहतात गावचा कारभार, शेतकऱ्यांची परवड ग्रामीण भागातील सजांकडे अण्णासाहेबांची पाठ

रामापूर : पाटण तालुक्यातील तलाठ्यांची त्यांच्या सजातील उपस्थिती हा चर्चेचा विषय आहे. विभागातील अनेक गावांतील तलाठी नेमणूक असलेल्या गावात न थांबता तालुक्यावरूनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची परवड होत आहे.शासनाने ग्रामीण भागातील जनता, विद्यार्थ्यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी लाखो रुपये खर्च करून तलाठी सज्जे उभे केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधण्यात आली. मात्र, बहुतांश तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या व इतर विविध कामांसाठी तलाठी कार्यालयातून सातबारा, खाते उतारा, विविध प्रकारचे दाखले आदी विविध कागदपत्रे विविध कामांसाठी लागत असतात.

शालेय विद्यार्थ्यांसह, नोकरदारांना विविध पदासाठींच्या भरती प्रक्रियेसाठी जात प्रमाणपत्र, रहिवासी, कुटुंब प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे महत्त्वाची ठरत असतात. मात्र ही कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासूनच संबंधित शेतकरी, ग्रामस्थ या तलाठ्यांचा शोध घेत असतात.

आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे हे तलाठी घिरट्या मारत असतात. अनेक तलाठी कधी-कधी मोबाईलही बंद ठेवतात. तर त्यांचा कोतवालही ग्रामस्थांना त्याबाबत व्यवस्थित माहिती सांगत नाही. परिणामी तलाठी व कोतवाल यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.अनेक गावांमध्ये खासगी क्लार्क किंवा गावचा कोतवालच तलाठ्यांची कामे करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह, विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी लागणारी स्वाक्षरी व कागदपत्रे घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. विशेष म्हणजे येथे आल्यानंतरही या तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरे जावे लागते. गत अनेक महिन्यांपासून तालुक्यातील सर्वच तलाठी आपल्या सज्जांचा कारभार तालुक्याच्या ठिकाणावरून हाकत असल्याचे दिसत आहे. या मनमानी कारभारावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे दिसत आहे.- चौकटकार्यालये बनली ह्यशोपीसह्णगावागावांत ज्याठिकाणी तलाठी कार्यालये उभारण्यात आलेली आहेत, त्याठिकाणी हे तलाठी हजर राहत नसल्याने ही कार्यालये शोभेची वस्तू बनू लागली आहेत. विद्यार्थी, शेतकऱ्यांना गावातच कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत व त्यांचे होणारे हाल थांबवावेत. संबंधितांना समज द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारSatara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास