शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

मावळ्यांच्या त्यागातून स्वराज्य निर्माण झाले

By admin | Updated: April 21, 2015 01:00 IST

शिवचरित्रकार रोहिदास हांडे : लक्ष्मणराव भरगुडे-पाटील व्याख्यानमाला

खंडाळा : ‘राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय आदर्श आणि राष्ट्रीय शौर्य यांचा त्रिवेणी संगम शिवशाहीत होता. कोणत्याही मोहिमेचे योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी या बळावर शिवरायांनी यश मिळविले. मावळ्यांच्या त्यागातून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यागी जीवनाचा अंगीकार केल्याखेरीज पुन्हा सुराज्य घडणार नाही, त्यासाठीच आजच्या समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज आहे म्हणूनच राष्ट्र निर्माणासाठी तरुणांनी पुढे यावे,’ असे आवाहन शिवचरित्रकार रोहिदास हांडे यांनी केले. पळशी, ता. खंडाळा येथे दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवरायांचे मावळे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, मिलिंद देशपांडे, लक्ष्मण वीर, सरपंच मनीषा भरगुडे, उपसरपंच सीताबाई भरगुडे, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष अशोक भरगुडे, सदस्या उज्ज्वला चव्हाण, सुनीता भरगुडे आदी प्रमुख उपस्थित होते. हांडे म्हणाले, ‘पळशी गावाला सांस्कृतिक वारसा आहे. एकीच्या बळावर समृद्ध खेडी पाहायचे असेल तर पळशीचा आदर्श घ्यावा लागेल. मॉरिसेस दौऱ्यावरही पळशी गावच्या कामाचा प्रसार करणार आहोत. गाव आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी संस्कृतीची जोपासना गरजेची आहे. बलशाली भारत घडविण्यासठी प्रत्येकाने सहानुभूतीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरण आले तरी ते स्वीकारले पाहिजे.’नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘जीवनात प्रत्येकाला आई-वडील समजले पाहिजेत. ज्यांच्यामुळे आपले जीवन आहे. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम पळशी ग्रामस्थांनी केले आहे. व्याख्यानमालेतून विचारधारा घराघरात पोहोचली म्हणूनच गावची एकी अबाधित राहिली आहे.’यावेळी माजी सभापती दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अशोक भरगुडे यांनी स्वागत केले. रमेश भरगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)