‘स्वराज’च्या विद्यार्थ्यांचा देशपातळीवर झेंडा
By Admin | Updated: November 23, 2014 23:45 IST2014-11-23T21:44:01+5:302014-11-23T23:45:21+5:30
वनवासमाची : राष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये प्रथम क्रमांकाचे परितोषिक

‘स्वराज’च्या विद्यार्थ्यांचा देशपातळीवर झेंडा
कऱ्हाड : वनवासमाची, ता़ कऱ्हाड येथील स्वराज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट या एम़ बी़ ए़ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये यश संपादन केले़
मनीषा वायदंडे व निलोफर उस्ताद यांनी ‘इथिकल डयलेमा आॅफ लिडरशिप’ या शोध निबंधाचे बारामती येथे झालेल्या ‘इथॉस’ या परिषदेमध्ये सादरीकरण केले होते़ त्यास उत्कृष्ठ शोधनिबंधाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले़
संस्थेचे सचिव अॅड़ दीपक थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बोलताना संगितले की, विविध कलागुणांना वाव देणाऱ्या योजना व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेला येथील उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग यांच्यामुळे ‘स्वराज’ च्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमधून बक्षिसे प्राप्त
केली.
अध्यक्ष प्रा़ अजित थोरात यांनी सांगितले की, पुणे-मुंबई स्तरावरील सर्व पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून,आंतरराष्ट्रीय कंपन्यांना हवा असलेला कौशल्यपूर्ण व्यवस्थापक स्वराजमध्ये घडविला जातो़
इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी अमोल वाळवे, मीना पवार, अपर्णा साळुंखे, रोहित जाधव, रोहित महापुरे, गणेश शिर्के यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे़ प्रा़ अरुण पाटील, प्रा़ विनय थोरात, प्रा़ धनंजय मोहिते व प्रा़ संध्या संकपाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले़ (प्रतिनिधी)