स्वाभिमानीने फाडले शेतकरी विरोधी विधेयक, कऱ्हाडात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:53 IST2020-09-25T13:51:01+5:302020-09-25T13:53:20+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी विरोधी विधेयक फाडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कऱ्हाड तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना याबाबतचे निवेदनही दिले.

स्वाभिमानीने फाडले शेतकरी विरोधी विधेयक, कऱ्हाडात निषेध
ठळक मुद्देस्वाभिमानीने फाडले शेतकरी विरोधी विधेयककऱ्हाडात निषेध : प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
सातारा/कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी विरोधी विधेयक फाडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कऱ्हाड तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना याबाबतचे निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक लोकसभा व राज्यसभेत कोणतीही चर्चा न करता मंजूर करून घेतले आहे. त्याचा आम्ही निषेध करीत असून ते विधेयक त्वरीत मागे घ्यावे. निवेदनावर देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे, दादासाहेब यादव आदींच्या सह्या आहेत.