शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

गावाची अंधश्रद्धा वेशीवर टांगली; स्वागत कमानीवर चक्क काळी बाहुली लावली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 5:51 PM

साताऱ्याच्या पश्चिमेला वसलेले दरे हे २०४ उंबऱ्यांचे व सुमारे ८५० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला सैनिकी परंपरा लाभली आहे. गावातील अनेकांनी सैन्यात सेवा केली असून, अनेक तरुण आजही कर्तव्य बजावत आहेत.

>> सचिन काकडे

सातारा : सातारा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या मातीत जन्मलेल्या नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या हयातीत अंधश्रद्धेला कायमच मूठमाती दिली. इतके करूनही लोकांच्या मनावर आरूढ झालेले अंधश्रद्धेचे भूत अजूनही उतरलेले नाही. सातारा तालुक्यातील दरे गावच्या स्वागत कमानीवर लटकविण्यात आलेल्या काळ्या बाहुलीने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

साताऱ्याच्या पश्चिमेला वसलेले दरे हे २०४ उंबऱ्यांचे व सुमारे ८५० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला सैनिकी परंपरा लाभली आहे. गावातील अनेकांनी सैन्यात सेवा केली असून, अनेक तरुण आजही कर्तव्य बजावत आहेत. येथील ग्रामस्थ व आजी- माजी सैनिक संघटनेकडून गावात २०२० रोजी भव्यदिव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली. कमानीवर असलेला राष्ट्रध्वज, बंदूकधारी सैनिक, बळीराजाचा सोबती असलेल्या बैलाची प्रतिकृती सारे काही लक्ष वेधून घेते. मात्र, याच कमानीवर राष्ट्रध्वजाच्या खालोखाल काळी बाहुली बांधून काही ग्रामस्थांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे.

केवळ नजर लागू नये, या उद्देशाने काही ग्रामस्थांकडून   स्वागत कमानीवर ही बाहुली बांधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खरोखरच काळी बाहुली लावून एखाद्या वस्तूचे संरक्षण होते का? हे समजण्याइतपत कोणीही अडाणी नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या मातीत सुरू केलेली अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आज जगभर पोहोचली. मात्र, आधुनिक युगातही अशा प्रकारची कृत्ये समाजातील काही विघातक घटकांकडून होत आहेत, यावर विश्वास बसत नाही. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार बंद व्हावेत यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पुन्हा एकदा मरगळ झटकावी लागणार आहे.

थोडा विचार कराच...

पोगरवाडीतून आरे गावात स्थायिक झालेले कर्नल संतोष महाडिक यांना कूपवाडा येथील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. त्यांच्या स्मृती आजही आरे, दरे, पोगरवाडी येथील ग्रामस्थांच्या मनात कायम आहेत. त्यांचा वारसा जपणाऱ्या दरे   ग्रामस्थांकडून अशा प्रकारच्या कृत्याला पाठबळ देणे योग्य नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास ३५० किल्ले बांधले. मात्र, त्यांनी किल्ल्यावर अशा बाहुल्या कधीच बांधल्या नाहीत. त्यामुळे ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? याचा दरे ग्रामस्थच नव्हे तर गाड्या, घर, कमानी व झाडांवर काळ्या बाहुल्या बांधणाऱ्या प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.

हे तर केवळ आत्मिक समाधान

एखाद्याने नवीन गाडी घेतली की, गाडीला लिंबू-मिरचीचे तोरण लटकवले जाते. काळी बाहुली अन् छोटी चप्पल असल्याशिवाय नव्या घराची पूजा होत नाही. पूजेनंतर या वस्तू घराच्या दर्शनी भागावर लटकवल्या जातात. बऱ्याचदा झाडाला लिंबू, टाचण्या व काळ्या बाहुल्या बांधल्या जातात. हा प्रकार अघोरी असून, यातून केवळ भोंदूबाबांचे पोट भरते. हे माहीत असूनही आपण अशा प्रकारांना खतपाणी घालत आहोत. खरोखरच अशा गोष्टींचा लाभ कितपत होतो, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, काळ्या बाहुल्या बांधून होतेय ते केवळ आपले आत्मिक समाधान.