प्रतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्या, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:47 IST2018-10-04T17:22:34+5:302018-10-04T17:47:56+5:30
किल्ले प्रतापगडाच्या कडेलोट पॉर्इंटवरून एका महिलेने आत्महत्या केली. यामुळे प्रतापगड परिसरात खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

प्रतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्या, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण
ठळक मुद्देतापगडच्या कडेलोट पॉर्इंटवरून महिलेची आत्महत्यामहाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण
महाबळेश्वर : किल्ले प्रतापगडाच्या कडेलोट पॉर्इंटवरून एका महिलेने आत्महत्या केली. यामुळे प्रतापगड परिसरात खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
या महिलेची चपल, पर्स घटनास्थळावर आढळली. पर्समध्ये ओळखपत्र होते. त्यावरून महिलेचे नाव ज्योती नवनीत बल्लाळ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या महिलेसोबत एक व्यक्ती आला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. घटनास्थळी प्रतापगड पोलीस पोहोचले असून, महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले आहे.