वनविभागाच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:27 IST2019-07-08T16:26:20+5:302019-07-08T16:27:19+5:30
गोडोली हद्दतील शिवराज तिकाटणेजवळ असलेल्या वनविभागाच्या जंगलामध्ये अमोल शंकर देशमुख (वय ३८, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ७ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.

वनविभागाच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या
सातारा : गोडोली हद्दतील शिवराज तिकाटणेजवळ असलेल्या वनविभागाच्या जंगलामध्ये अमोल शंकर देशमुख (वय ३८, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ७ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
अमोल देशमुख हे घरातून निघून गेले होते. शिवराज तिकाटण्यावरील वनविभागाच्या जंगलात एका झाडाला त्यांचा मृतदेह लटकत असताना काही लोकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. देशमुख यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. राहुल भीमराव बागल (वय ३६, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.