कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 16:29 IST2019-09-03T16:26:35+5:302019-09-03T16:29:11+5:30

कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर हद्दीत एका महिलेने कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. ३ रोजी दुपारी एक वाजता घडली. सुनंदा प्रकाश माने (वय ४८, रा. करवडी, ता. कऱ्हाड) असे मृत महिलेचे नाव आहे. याची कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Suicide by jumping into Krishna river | कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या

कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या

ठळक मुद्देकृष्णा नदीत उडी मारून आत्महत्याकऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर हद्दीत एका महिलेने कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. ३ रोजी दुपारी एक वाजता घडली. सुनंदा प्रकाश माने (वय ४८, रा. करवडी, ता. कऱ्हाड) असे मृत महिलेचे नाव आहे. याची कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सैदापूर येथील नवीन कृष्णा पुलावरून सुनंदा माने यांनी मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी टाकली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. माने यांचा मृतदेह बाहेर काढला. येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

Web Title: Suicide by jumping into Krishna river