तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या, कोरेगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:45 IST2022-05-09T14:45:07+5:302022-05-09T14:45:24+5:30
कोरेगाव : तरुण व्यावसायिकाने झाडाच्या फांदीला गळफास घेवून आपले जीवन संपवले. महेश शिरतोडे (वय २६) असे या मृत तरुण ...

तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या, कोरेगाव तालुक्यातील घटना
कोरेगाव : तरुण व्यावसायिकाने झाडाच्या फांदीला गळफास घेवून आपले जीवन संपवले. महेश शिरतोडे (वय २६) असे या मृत तरुण व्यावसायिकाचे नाव आहे. आझादपूर ता. कोरेगाव येथे सामाजिक वनीकरनाजवळ तलावानजीक काल, रविवारी ही घटना घडली. महेश हा बकरी पालनाचा व्यवसाय करत होता. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, आझादपूर येथील अनिल शिरतोडे यांच्यासह कुटुंबातील सदस्य व भाऊबंद बकरी पालनाचा व्यवसाय करतात. गावातच सामाजिक वनीकरण विभागाच्या तलावानजीक त्यांनी काल, रविवारी एका शेतकऱ्याच्या शेतात बकरी बसविल्या होत्या. महेश हा रात्रीच्या सुमारास कोणासही काहीही न सांगता निघून गेला होता. आज, सोमवारी सकाळी त्याने झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केल्यानंतर अनिल शिरतोडे यांनी कोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी आकस्मित मृत्यू अशी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक कुंभार तपास करीत आहेत.