साताऱ्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 10:24 IST2019-12-21T10:23:07+5:302019-12-21T10:24:57+5:30

सातारा शहर व परिसरात विविध ठिकाणी दोन पुरुषांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Suicide bomber kills two in Satara | साताऱ्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

साताऱ्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देसाताऱ्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्याशाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद

सातारा : शहर व परिसरात विविध ठिकाणी दोन पुरुषांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

प्रमोद बुवासाहेब ढोणे (वय ३३, रा. रामाचा गोट, मंगळवार पेठ, सातारा) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दि. १८ रोजी दुपारच्या सुमारास घडला. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निकाळजे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर दुसरी घटना बसाप्पा पेठेत दि. १६ रोजी रात्री दहा वाजता घडली. रामचंद्र सोना आग्रे (वय ५०, रा. बसाप्पा पेठ, राधिका रोड, सातारा) यांनी सुद्धा राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. ढोणे आणि आग्रे यांनी आत्महत्या कोणत्या कारणातून केल्या, हे अद्याप समोर आले नसून पोलीस त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत.

Web Title: Suicide bomber kills two in Satara