पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:03 IST2020-01-21T12:00:57+5:302020-01-21T12:03:56+5:30

सातारा : जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सातारा शहर पोलीस ठाण्यातच बाटलीतील विषारी औषध पिण्याचा प्रयत्न केल्याने एकच ...

Suicide attempt of an employee at a police station | पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्देपोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्नपोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत प्रकार कैद

सातारा : जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सातारा शहर पोलीस ठाण्यातच बाटलीतील विषारी औषध पिण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, प्रेम प्रकरणातून एका पोलीस कर्मचाऱ्याला चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी बोलावले होते. यावेळी तू-तू मैं मैं झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने अचानक खिशातील बाटलीमधील विषारी औषध पिण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्या हातातील बाटली उडवली. त्यामुळे पोलीस ठाण्यातच विषारी औषधाची बाटली सांडली गेली. सर्वत्र उग्र वास पसरला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी फरशी स्वच्छ केली. हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली होती. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.

Web Title: Suicide attempt of an employee at a police station