शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, शेतकऱ्यांची जलसिंचनाची समस्या सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:34 IST

शेतकऱ्यांना बागायती पिकांचे नियोजन करता येणार

संतोष धुमाळपिंपोडे बुद्रूक : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सातारा सिंचन मंडळाच्या आधिपत्याखालील सहा मोठ्या व सहा मध्यम धरण प्रकल्पांमध्ये जानेवारीच्या प्रारंभी समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.सद्य:स्थितीत धरणांमध्ये ८४.२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसिंचनाच्या व वीजनिर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या कोयना धरणामध्ये ८३.३१ टक्के तर धोम धरणांमध्येदेखील ८३.३१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांतील उपलब्ध पाणीसाठा बघता जिल्हावासींची पुढील जूनपर्यंत तहान भागविताना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे.जिल्ह्यात गतवर्षी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत माॅन्सूनने मुक्काम ठोकला. अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या दीड पट पर्जन्याची नोंद झाली. काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. अखेरच्या टप्प्यातील पावसाने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. जिल्ह्यात आजमितीस १२२.४२ अब्ज घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये याच काळात १२३.८२ अब्ज घनफूट (८५.२३ टक्के) पाणी होते. तर सातारा सिंचन मंडळात असलेल्या व जलसिंचनाचे बहुतांशी क्षेत्र पुणे जिल्ह्यात असलेल्या निरा-देवघर, भाटघर, वीर धरणांमध्ये ३८.९० अब्ज घनफूट पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी, मोरणा, उत्तरामांड, नागेवाडी, महू, हतगेघर या सहा धरणांमध्ये १२२.४२ अब्ज घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याची टक्केवारी ८४.२६ टक्के एवढी आहे. सद्य:स्थितीतील धरणांचा समाधानकारक पाणीसाठा विचारात घेता यावर्षी जलसिंचनाची समस्या भेडसावण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांचे नियोजन करता येणार आहे. अर्थात, त्यासाठी जलसंपदा विभाग व शेतकरी यांनीदेखील पाणीवाटपाचे व पाणीवापराचे काटकसरीचे नियोजन करावयास हवे.

आजअखेरीस जिल्ह्यांतील धरणांमधील समाधानकारक पाणीसाठा असला, तरी पाण्याचा सुयोग्य व काटकसरीने वापर झाला पाहिजे. नदीच्या विशेषत: पाण्याच्या प्रदूषणाबाबत शासन राबवीत असलेल्या ‘चला, जाणूया नदीला’ या अभियानाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यकाळात आपण याबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. -संजय डोईफोडे, अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन विभाग. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीDamधरणFarmerशेतकरी