विद्यार्थ्यांनी शिवरायांचे चरित्र अभ्यासावे : रणवरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:44+5:302021-06-16T04:50:44+5:30
मलटण : ‘विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र विद्यार्थीदशेतच अभ्यासावे. स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांनी ...

विद्यार्थ्यांनी शिवरायांचे चरित्र अभ्यासावे : रणवरे
मलटण : ‘विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र विद्यार्थीदशेतच अभ्यासावे. स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांनी सह्यादीच्या कडेकपारीला कसे भक्कम केले, याची जाण प्रत्येकालाच हवी,’ असे मत उद्योजक मनोहर रणवरे यांनी व्यक्त केले.
लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांतून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभ्यासता यावे, यासाठी सरदार जिवाजी सुभानराव रणवरे प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना निंभोरे येथे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी चित्रपट व सांस्कृतिक विभाग, पुणे अध्यक्ष प्रमोद रणवरे, प्रशांत रणवरे, अमित रणवरे, प्रमोद रणवरे, मुकुंद रणवरे, अभिजीत रणवरे, नीलेश महाराज रणवरे, अनिल रणवरे, नितीन रणवरे, आदी उपस्थित होते.