शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: एसटीच्या चाकाखाली सापडून विद्यार्थिनी ठार, गाडीत बसताना वाई स्थानकात घडली दुर्दैवी घटना

By दत्ता यादव | Updated: August 12, 2023 16:14 IST

एसटी चालकास वाई पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा : वाई येथील स्थानकात एसटीच्या चाकाखाली सापडून एका १३ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रावणी विकास आयवळे (वय १३, रा. सुलतानपूर, ता. वाई) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. वाईमधील जोशी विद्यालयात ती ७ वी मध्ये शिकत होती. हा अपघात आज, शनिवारी दुपारच्या सुमारास झाला. अपघातानंतर बसस्थानकात एकच खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी, वाई बालेघर एसटी (एमएच १४ बीटी ०४९६) बसस्थानकातील फलाटावर लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी श्रावणी आयवळे ही विद्यार्थिनी एसटीच्या मागच्या बाजूस पडली. एसटी मागे येत असल्याने तिचे डोके एसटीच्या चाकाखाली चिरडले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली.या घटनेची माहिती मिळताच  परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. एसटी चालक जीवन मारुती भोसले (वय ३६, नांदवळ) याला वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाईAccidentअपघातStudentविद्यार्थीDeathमृत्यू