शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कराड येथे विद्यार्थ्याने वसतीगृहात संपविले जीवन, कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:16 IST

एकुलत्या एक मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांना बसला धक्का 

कराड : कराडमध्ये एका महाविद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने खोलीमध्ये पंख्याला गळफास घेतला. ही आत्महत्येची घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली. त्याने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप समोर आले नसून पोलिस याची चाैकशी करत आहेत.संबंधित अल्पवयीन मुलगा महाविद्यालयाच्या आवारात असणाऱ्या वसतिगृहात राहत होता. तो नुकताच गावी गेला होता. बुधवारी रात्री वसतिगृहात तो परतला . त्याच्यासोबत खोलीत दुसरे कोणी नव्हते. मात्र, गुरुवारी सकाळी त्याने त्याच्या खोलीचे दार उघडले नसल्याने शंका आली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दार उघडले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. दरम्यान, याबाबत कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्याचा पंचनामा केला.‘तो’ एकुलता एकआत्महत्या केलेला अल्पवयीन मुलगा हा माण तालुक्यातील आहे. तो एकुलता एक होता. त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या घरातल्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Student commits suicide in Karad hostel, reason unclear.

Web Summary : A 17-year-old student in Karad tragically ended his life in his hostel room. The incident came to light Thursday morning. Police are investigating the cause of suicide. The boy was the only child of his parents, deepening the family's grief.