शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी विद्यार्थ्याने बनविला ‘रोबोट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:40 IST

ढेबेवाडी : कोरोना रुग्णांना सेवा सुविधा पोहोचविण्याबरोबरच तेथील साफसफाई करताना येणाऱ्या अडचणी सर्वश्रुत आहेत. हेच ओळखून या अडचणी दूर ...

ढेबेवाडी : कोरोना रुग्णांना सेवा सुविधा पोहोचविण्याबरोबरच तेथील साफसफाई करताना येणाऱ्या अडचणी सर्वश्रुत आहेत. हेच ओळखून या अडचणी दूर करणारा अनोखा रोबोट ढेबेवाडीतील विद्यार्थ्याने बनविला आहे.

रुग्णालयात दाखल, तसेच होम क्वारंटाइन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे, तसेच साहित्य पुरविण्याबरोबरच तेथील फरशीची साफसफाई हा रोबोट करू शकतो. हा रोबोट ढेबेवाडीच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व चंद्रकांत पाटील या विद्यार्थ्याने बनविला आहे. मंद्रुळकोळे हे अथर्वचे मूळगाव आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या, तसेच होम क्वारंटाइन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे, तसेच साहित्य पुरविण्याबरोबरच तेथील फरशीच्या साफसफाईवर येणारी मर्यादा लक्षात घेऊन या कामासाठी अनोखा रोबोट बनविण्याचा विचार अलीकडेच अथर्वच्या मनात आला.

विज्ञान शिक्षक व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक डॉ. सुधीर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी इन्स्पेक्टर मोहनराव कदम यांच्या प्रोत्साहनाने दोन आठवडे मेहनत घेऊन त्याने हा रोबोट प्रत्यक्षात साकारला. त्यासाठी घरात पडून असलेल्या काही वस्तूंसह बाजारातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही त्याने वापर केला आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत घेतलेल्या वैज्ञानिक खेळणी व उपकरण स्पर्धेत या रोबोटला संस्था पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला. अथर्वच्या यशाबद्दल प्राचार्य जी. जी. साठे यांनी अथर्व व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक डॉ. सुधीर कुंभार, तत्कालीन प्रभारी प्राचार्य एस. एस. कदम व अन्य शिक्षकांचा सत्कार केला.

- चौकट

रोबोटची वैशिष्ट्ये

१) अथर्वने बनविलेला रोबोट बेसला बसविलेल्या चाकांवरून इकडून-तिकडे फिरतो.

२) हातावर बसवलेल्या ट्रे मधून औषधे, गोळ्या, तसेच अन्य वस्तू रुग्णांपर्यंत पोहोचवता येतात.

३) रोबोटला बसविलेल्या स्क्रबरने फरशीची साफसफाईही करता येते.

४) रोबोटची बॅटरी चार तास चार्ज केल्यावर तो आठ तास कार्यरत राहतो.

५) वायफाय कनेक्ट कॅमेऱ्याद्वारे रुग्णांशी संवाद साधता येतो.

६) वीस फुटांच्या अंतरात रिमोटच्या साह्याने रोबोट नियंत्रितही करता येतो.

- चौकट

केवळ हजार रुपये खर्च

रोबोट बनविण्याची संकल्पना सूचल्यानंतर अथर्वने शिक्षकांसह पालकांशी चर्चा केली, तसेच रोबोटसाठी आवश्यक असणारे साहित्य जमविण्यासही त्याने धावपळ केली. त्यासाठी घरात पडून असलेल्या काही वस्तूंचा त्याला उपयोग झाला, तर बाहेरून त्याला केवळ एक हजार रुपयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तू आणाव्या लागल्या. केवळ हजार रुपयात त्याने हा रोबोट साकारला आहे.

फोटो : २२केआरडी०२

कॅप्शन : ढेबेवाडी, ता. पाटण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व पाटील याने कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबोट तयार केला आहे.